
brutal incident in Bhokardan : जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एका तरुणाला विवस्त्र करुन त्याच्या गुप्तांगासह शरीरावर लोखंडी रॉडने चटके दिल्याच्या भयंकर घटनेने जालना जिल्हा हादरला आहे. भोकरदनमधील या घटनेत कैलास बोराडे नावाचा तरुण गंभीर जखमी झाला आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचे पडसाद आज अधिवेशनातही पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या अमानुष मारहाणीची दखल घेण्यात आली असून या घटनेतील गुन्हेगारांना पाठीशी न घालता त्यांच्यावर ‘मकोका' लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत सांगितले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्दा सदस्य शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, यासंदर्भात मी जालनाच्या पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे. जालन्याचे पालकमंत्री तिथं भेट देणार आहेत. बोराडे यांना झालेली मारहाण अतिशय अमानुष आहे. त्या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यावर अंगावर शहारा येतो, इतकी अमानुष पद्धतीने मारहाण झाली आहे.
नक्की वाचा - Akola Crime : पत्नी परीक्षेसाठी माहेरी; पतीने मामेबहिणीला पळवून केलं लग्न; तरुणीचा पोलीस ठाण्यात राडा
या मारहाणीत बोराडे गंभीर जखमी झाले आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्याशी फोनवरुन संवाद साधला आणि धीर दिला. या घटनेतील गुन्हेगारांना अजिबात पाठीशी घालणार नाही. त्यांना ‘मकोका' लावण्याची प्रक्रिया गृह विभागामार्फत करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world