सौरभ वाघमारे, सोलापूर
स्मशानभूमीमध्ये दफन केलेल्या बाळाचा मृतदेह गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलपुरातील मोदी स्मशानभूमीमधील ही घटना आहे. प्रियांश वाघमारे असे 10 महिन्यांच्या मृत मुलाचे नाव होते. खेळताना इजा झाल्याने प्रियांशला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, पण 14 जून रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर मोदी स्मशानभूमीमध्ये त्याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. दरम्यान रविवारी (16 जून) तिसऱ्या दिवसाचा विधी करण्यासाठी घरच्या मंडळींसह नातेवाईक स्मशानभूमीमध्ये पोहोचले होते, त्यावेळेस त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. बाळाचा मृतदेह स्मशानभूमीमध्ये पुरलेल्या ठिकाणी नव्हताच. तेथून माती उपसण्यात आल्याचे दिसले. या घटनेनंतर नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे आणि पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे.
(ट्रेडिंग न्यूज : 'चल यार दारु पिते है', मित्राला केलेल्या मेसेजमुळे सापडला डोंबिवलीतील वृद्ध महिलेचा मारेकरी)
(ट्रेडिंग न्यूज : रवीना टंडनवर मारहाणीचा आरोप करणं भोवले, आता अभिनेत्रीने धाडली 100 कोटींची मानहानीची नोटीस
(ट्रेडिंग न्यूज : मुंबईच्या आईस्क्रीममध्ये कसं आलं माणसाचं तुटलेलं बोट? गाझियाबादशी आहे कनेक्शन)