जाहिरात

Akola News : भरबाजारात मृतदेह आढळल्याने खळबळ; चेहऱ्याची भयाण अवस्था, जिल्ह्यात भीतीचं सावट

अकोला जिल्ह्यात गेल्या आठवड्यात सलग तीन भयानक घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Akola News : भरबाजारात मृतदेह आढळल्याने खळबळ; चेहऱ्याची भयाण अवस्था, जिल्ह्यात भीतीचं सावट

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Akola Murder : अकोल्याच्या बार्शीटाकळी शहरातील नवीन बस स्टँडजवळील (Murder near Bus Stand) जय मल्हार पान पॅलेस परिसरात आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, काल 26 ऑक्टोबर, रविवारी मध्यरात्री ही हत्या किंवा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतदेह पाहिल्यानंतर काही नागरिकांनी चेहऱ्यावर अॅसिड फेकण्यात आल्याचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, पोलिसांनी ही घटना अपघात असण्याची शक्यता व्यक्त केली असून, तपास सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा सुरू केला असून तपासासाठी डॉग स्क्वॉड पथक, फॉरेन्सिक लॅब व्हॅन तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहितीही समोर आली आहे.

NEET Student death : 40 मिनिटं Video कॉलवर बोलला, NEET च्या विद्यार्थ्याच्या मृत्यूने वडिलांना धक्का!

नक्की वाचा - NEET Student death : 40 मिनिटं Video कॉलवर बोलला, NEET च्या विद्यार्थ्याच्या मृत्यूने वडिलांना धक्का!

सलग तीन भयानक घटनांनी अकोला हादरलं...

दरम्यान, मृतदेहाजवळ सापडलेल्या आधार कार्डवरून मृत व्यक्तीची ओळख अफसर खा रशीद खा (वय 32, रा. इंदिरानगर, बार्शीटाकळी) अशी पटली आहे. मात्र मृतदेहाचा चेहरा पूर्णतः जळालेला असल्याने प्रत्यक्ष ओळख पुष्टीसाठी पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला असला तरी, पोलिस तपासानंतरच घटनेचं खरं स्वरूप समोर येणार आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यात गेल्या आठवड्यात सलग तीन भयानक घटना घडल्या आहेत. 22 ऑक्टोबरला अक्षय नागलकर हत्या प्रकरण, त्यानंतर 25 ऑक्टोबरला तेल्हारा तालुक्यातील आडसूळ येथे अनोळखी व्यक्तीचा चेहरा जाळून खून, आणि आता बार्शीटाकळीत तशीच आणखी एक घटना समोर आली आहे.

या सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांना रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची गरज भासते आहे अशी नागरिकांची मागणी होत आहे. तर दुसरीकडे नागरिकांनी पोलिस प्रशासनावर नाराजी व्यक्त करत, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात या घटनेनंतर पुन्हा एकदा भीतीचं सावट पसरलं आहे आणि पोलिसांकडून पुढील तपास जोरात सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com