जामीन मंजूर, मात्र तुरुंगातून सुटका नाही; अरविंद केजरीवाल प्रकरणात महत्त्वाची अपडेट!

Arvind Kejriwal : सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
नवी दिल्ली:

सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal bail) यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. ईडी प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ED प्रकरणात जामीन मंजूर केला. याबाबत न्यायालयाने म्हटलं, अरविंद केजरीवाल 90 दिवसांपासून तुरुंगात आहेत. ते निवडून आलेले लोकप्रतिनिधी असल्याचीही आम्हाला जाणीव आहे. मात्र या पदावर कायम राहायचं की नाही हे त्यांनी ठरवावं, असंही कोर्टाने यावेळी सांगितलं. मात्र जामीन मंजूर झाला असला तरीही अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता नाही. ईडी प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला असला तरी सीबीआय प्रकरणात त्यांची सुटका झालेली नाही. त्यामुळे अद्यापही ते सीबीआयच्या न्यायालयीन तुरुंगात आहेत.

बातमी अपडेट होत आहे.