जाहिरात

Delhi Crime: 'माझ्यासोबत चल, विदेशात घेऊन जातो'; दिल्लीतील ढोंगी बाबाचा WhatsApp Chat उघड, 17 मुलींसोबत...

Swami Chaitanyananda : दिल्लीतील एका आश्रमातील चैतन्यानंद नावाच्या ढोंगी बाबाने तरुण मुलींना आपल्या जाळ्यात फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Delhi Crime: 'माझ्यासोबत चल, विदेशात घेऊन जातो'; दिल्लीतील ढोंगी बाबाचा WhatsApp Chat उघड, 17 मुलींसोबत...
Swami Chaitanyananda :पोलिसांनी केलेल्या तपासात चैतन्यानंद 16 वर्षांपासून हे प्रकार करत असल्याचे उघड झाले आहे.
मुंबई:

Swami Chaitanyananda : दिल्लीतील एका आश्रमातील चैतन्यानंद नावाच्या ढोंगी बाबाने तरुण मुलींना आपल्या जाळ्यात फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याने 'माझ्यासोबत चल, विदेशात घेऊन जातो', असे WhatsApp मेसेज पाठवून 17 मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत या ढोंगी बाबाचा गेल्या 16 वर्षांपासून सुरू असलेला 'गंदा' खेळ उघड झाला आहे.

UN नंबर प्लेटचा वापर

दिल्ली पोलिसांच्या अतिरिक्त डीसीपी (दक्षिण पश्चिम) ऐश्वर्या सिंग यांनी सांगितले की, चैतन्यानंद हा युनायटेड नेशन्सच्या डिप्लोमॅटिक नंबर प्लेटचा वापर करत होता, जेणेकरून कोणी त्याच्यावर संशय घेणार नाही. तो मुलींना WhatsApp वर मेसेज करून आपल्या खोलीत बोलवत असे. मुली न आल्यास त्यांना परीक्षेत नापास करण्याची किंवा त्यांचे गुण कमी करण्याची धमकी देत असे.

वॉर्डनचीही मदत

या प्रकरणात 3 वॉर्डनचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. या वॉर्डन मुलींना धमकावून त्यांचे WhatsApp चॅट्स डिलीट करायला लावत होत्या. पोलिसांनी या प्रकरणात तिन्ही वॉर्डनचे जबाब नोंदवले आहेत.

( नक्की वाचा : Dombivli : डोंबिवली हादरले: नमाजासाठी आलेल्या तरुणांना पोलिसांसमोरच मारहाण; शिंदे गटाच्या सरपंचावर आरोप )
 

16 वर्षांपासून  ‘गंदा' खेळ

पोलिसांनी केलेल्या तपासात चैतन्यानंद हा गेल्या 16 वर्षांपासून अशाप्रकारे गुन्हे करत असल्याचे समोर आले आहे. मुलींच्या फोनमधून चॅट डिलीट करण्याचा तो प्रयत्न करत असे, मात्र पोलिसांनी सुमारे 50 विद्यार्थिनींच्या फोनची तपासणी केली, ज्यात डिलीट केलेले चॅट पुन्हा मिळवण्यात यश आले. सर्व पीडित विद्यार्थिनी आर्थिकदृष्ट्या मागास (EWS) गटातील असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आर्थिक फसवणुकीचाही आरोप

चैतन्यानंद केवळ लैंगिक शोषणाचाच नाही, तर आर्थिक फसवणुकीचाही आरोपी आहे. तो ज्या व्होल्वो गाडीचा वापर करत होता, ती दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत आहे. तसेच, त्याने मठाचीही फसवणूक केल्याचा आरोप असून, पोलीस या प्रकरणाचीही चौकशी करत आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com