Delhi Murder: देशाची राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक प्रकरण उघड झालं आहे. दिल्लीत एका महिलेने तिचा पती मोहम्मद शाहिद याची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी आता त्या महिलेला अटक केली आहे. पती-पत्नी दोघेही उत्तर प्रदेशातील बरेलीची रहिवासी आहेत. या महिलेनं आधी पतीची हत्या केली. त्यानंतर तपासाची दिशाभूल करण्यासाठी तिने खोटी माहिती दिली, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी महिलेचे नाव फरजाना आहे.
काय आहे प्रकरण?
20 जुलै रोजी संध्याकाळी बाह्य दिल्लीतील निहाल विहार पोलिस ठाण्याला रुग्णालयातून फोन आला. फोन करणाऱ्याने पोलिसांना सांगितले की, एक महिला तिच्या पतीसोबत आली आहे. तिच्या पतीच्या शरीरावर चाकूने वार केल्याचे निशाण आहेत. पतीचा मृत्यू झाला आहे. या कॉलमुळे दिल्ली पोलिसांचे एक पथक तात्काळ रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयात पोलिसांना ती महिला भेटली. त्यावेळी आपल्या पतीनं स्वत:ला चाकू मारुन आत्महत्या केली अशी माहिती या महिलेनं पोलिसांना दिली.
( नक्की वाचा : Nalasopara Murder: 'ती'चूक केली आणि पतीची हत्या करणारे पत्नी -बॉयफ्रेंडचा खेळ झाला खल्लास! )
आणि पोलिसांना समजलं सत्य
मात्र, पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून पोलिसांना समजले की, चाकूचे जे निशाण होते, ते स्वतःहून मारल्याने होऊ शकत नाहीत. ज्या पद्धतीने चाकूंनी मारल्याचे जखमांचे निशाण होते, त्यावरून हे स्पष्ट झाले तरुणाला समोरून चाकू मारण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी खुनाच्या कलमाखाली एफआयआर नोंदवून तपास सुरू केला.
सर्च हिस्ट्रीमुळे समजले रहस्य
पोलिसांनी जेव्हा शाहिदच्या पत्नीची कसून चौकशी केली आणि तिच्या मोबाईल फोनची तपासणी केली, तेव्हा सर्व सत्य समोर आले. सर्च हिस्ट्रीवरून पोलिसांना समजले की, महिलेने चॅट कसे डिलीट करायचे, सल्फासचा वापर कसा केला जातो आणि त्याचा प्रभाव किती घातक असू शकतो, याबद्दल माहिती मिळवली होती.
यानंतर जेव्हा पोलिसांनी महिलेची चौकशी केली, तेव्हा तिने सांगितले की, तिचा पती तिला शारीरिकरित्या संतुष्ट करू शकत नव्हता, त्यामुळे तिने पतीच्या हत्येचा कट रचला. माहितीनुसार, महिलेने सर्व माहिती गोळा केल्यानंतर संधी पाहून त्याच्या छातीवर तीन वेळा चाकूने वार केले, नंतर स्वतः त्याला रुग्णालयात घेऊन गेली आणि आत्महत्येची खोटी कहाणी सांगितली. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली महिलेला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.