Delhi Gandhi Vihar Murder Mystrey: राजधानी दिल्लीच्या (New Delhi) गांधी विहार (Gandhi Vihar) परिसरात काही आठवड्यांपूर्वी गॅस सिलेंडरच्या स्फोटात युपीएससी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला होता. प्रथमदर्शी ही एक दुर्घटना वाटत होती मात्र आता या प्रकरणात हादरवुन टाकणारा ट्वीस्ट समोर आला आहे. ज्या घटनेला सर्वजण 'अपघात (Accident)' मानत होते, त्या खोलीत प्रत्यक्षात एक सुनियोजित हत्या झाली होती.
या 'मर्डर मिस्ट्री'ची सूत्रधार दुसरी-तिसरी कोणी नसून, फॉरेंसिक सायन्सची विद्यार्थिनी निघाली. पोलिसांच्या तपासणीत असे उघड झाले आहे की, तिने तिच्या माजी प्रियकर (Ex-Boyfriend) आणि एका मित्राच्या मदतीने युपीएससीची (UPSC) तयारी करत असलेल्या रामकेश मीना याची (Ramkesh Meena) क्रूर हत्या (Brutal Murder) केली आणि त्यानंतर आग लावून तो अपघात असल्याचे भासवण्याचा कट रचला. नेमकं काय आहे हे प्रकरण? वाचा..
6 ऑक्टोबर रोजी घडलेली घटना
६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी दिल्ली पोलिसांना गांधी विहारमधील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) टीमने आग विझवली, पण आतील दृश्य भयानक होते. आतमध्ये ३२ वर्षीय रामकेश मीनाचा भाजलेला मृतदेह (Charred Body) आढळून आला. रामकेश येथे राहून युपीएससीची तयारी करत होता. सुरुवातीला हा गॅस गळतीमुळे (Gas Leak) झालेला अपघात मानला जात होता, पण मृतदेहाची स्थिती आणि खोलीतील विखुरलेल्या वस्तूंमुळे पोलिसांना संशय आला.
Crime News : उधारी परत न केल्याची शिक्षा, 2 हजार रुपयांसाठी मित्राला संपवलं
सीसीटीव्ही फुटेजमधून उलगडा
गुन्हे अन्वेषण (Crime Team) आणि एफएसएल (FSL) टीमने घटनास्थळी तपासणी केली आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासले, तेव्हा संपूर्ण रहस्य उलगडले. ५ आणि ६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री सुमारे २:२० वाजता तोंडाला रुमाल बांधलेले दोन लोक इमारतीत शिरले आणि थोड्याच वेळात त्यापैकी फक्त एक जण बाहेर पडला. त्यानंतर सुमारे २:५७ वाजता अमृता चौहान (Amrita Chauhan) नावाची मुलगी तिच्या साथीदारासह इमारतीतून बाहेर जाताना दिसली. काही मिनिटांनंतर आग लागली. पोलिसांनी अमृताच्या मोबाइलचा डेटा आणि कॉल रेकॉर्ड्स तपासले, तेव्हा तिचे लोकेशन त्याच रात्री गांधी विहारजवळ असल्याचे निश्चित झाले. यानंतर पोलिसांचा संशय खात्रीत (Doubt turned into certainty) बदलला.
१८ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अमृता चौहानला मुरादाबादमधून (Moradabad) अटक केली. चौकशीदरम्यान तिने आपला गुन्हा कबूल (Confessed) केला. तिने तिचे दोन मित्र— सुमित कश्यप (माजी प्रियकर, एलपीजी वितरक - LPG Distributor) आणि संदीप कुमार (पदवीधर, एसएससी उमेदवार) यांच्यासोबत मिळून हत्येचा कट रचल्याचे सांगितले.
का केली हत्या?
अमृताने पोलिसांना सांगितले की, रामकेश मीना तिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये (Live-in relationship) राहत होता. रामकेशने तिचे काही खासगी व्हिडिओ (Private Videos) आणि फोटो एका हार्ड डिस्कमध्ये (Hard Disk) सेव्ह करून ठेवले होते. जेव्हा अमृताने ते डिलीट करण्याची मागणी केली, तेव्हा रामकेशने साफ नकार दिला. या रागातून अमृताने तिचा एक्स-बॉयफ्रेंड सुमितला ही गोष्ट सांगितली आणि दोघांनी मिळून हत्येची योजना आखली.
असा रचला कट
फॉरेंसिक सायन्सची विद्यार्थिनी असल्यामुळे अमृताला पुरावे कसे मिटवायचे याची पूर्ण माहिती होती. ५-६ ऑक्टोबरच्या रात्री तिघेही गांधी विहार येथे पोहोचले. त्यांनी आधी रामकेशचा गळा दाबला, नंतर काठीने मारहाण करून त्याची हत्या केली. त्याच्या मृतदेहावर तूप, तेल आणि वाईन टाकली, जेणेकरून आग वेगाने भडकावी. सुमितने सिलेंडरची नॉब (Knob) उघडून गॅस पसरवला आणि आग लावली.
Akola News : भरबाजारात मृतदेह आढळल्याने खळबळ; चेहऱ्याची भयाण अवस्था, जिल्ह्यात भीतीचं सावट
अमृताने दरवाजाची जाळी काढून आतून गेटला कुलूप लावले (Lock from inside), जेणेकरून तो अपघात भासावा. एलपीजी सिलेंडर वितरक असलेल्या सुमित कश्यपला गॅस सिलेंडर कधी आणि कसा फुटेल याची पूर्ण माहिती होती. त्याने सिलेंडरची नॉब उघडून, शवजवळ ठेवून आग लावली आणि बाहेर पडला. सुमारे एका तासानंतर मोठा स्फोट (Blast) झाला आणि खोलीत आग भडकली. बाहेरच्या लोकांना हा सर्व प्रकार गॅस स्फोटामुळे घडलेला अपघात वाटला. १८ ते २३ ऑक्टोबर दरम्यान पोलिसांनी या तिन्ही आरोपींना मुरादाबाद येथून अटक केली. अमृताच्या ठिकाणाहून हार्ड डिस्क, ट्रॉली बॅग आणि मृताचा शर्ट जप्त करण्यात आला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world