मद्य धोरण घोटाळा प्रकरण : CBI ने अरविंद केजरीवाल यांना कोर्टातच केली अटक

सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांना अधिकृतपणे अटक केली आहे.

Advertisement
Read Time: 1 min
नवी दिल्ली:

सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांना अधिकृतपणे अटक केली आहे. राऊस अव्हेन्यू कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान, सीबीआयच्या वतीने सरकारी वकिलांनी केजरीवाल यांची काही काळ चौकशी करण्यासाठी कोर्टाकडून परवानगी मागितली. त्यानंतर त्यांनी केजरीवाल यांना अटक केली. 

सीबीआयने याबाबत सांगितलं की, केजरीवाल न्यायालयीन अटकेत होते. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत केजरीवाल यांना अटक केलं नव्हतं. याबाबत सीबीआयचे वकील म्हणाले, केजरीवालांच्या वकिलाचा आरोप चुकीचा आहे. स्वत: आम आदमी पक्षाने धोरण तयार केलं आणि तेच धोरण लागू केलं.वारंवार तपास संस्थांवर आरोप केले जाणं चुकीचं आहे, असंही सीबीआयने यावेळी म्हटलं. 

नक्की वाचा - Live Update : ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड

सीबीआयने मंगळवार आणि बुधवारी अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगात बराच काळ चौकशी केली होती. यावेळी केजरीवालांना कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यासंबंधित प्रश्न विचारण्यात आले. सीबीआयने सुरुवातीला या प्रकरणात केस दाखल केली , तेव्हा केजरीवालांना आरोपी ठरवलं नव्हतं. मात्र नंतर ईडीने केस दाखल करीत अरविंद केजरीवालांना (Kejriwal arrested by CBI) आरोप ठरवलं. 

Advertisement