पुनीत खुराणा हे दिल्लीतील मॉडल टाऊनमध्ये राहात होते. त्यानी नववर्षाच्या पुर्वसंध्येला म्हणजे 31 डिसेंबरच्या संध्याकाळी (Delhi Puneet Khurana Murder Csse)आत्महत्या केली. या मागचे कारण पाहीले असता काही महिन्या पुर्वी झालेल्या अतुल सुभाष केसची आठवण येते. पत्नीच्या जाचाला कंटाळून खुराणा यांनी आत्महत्या केली आहे. त्या आधी त्याचे त्याच्या पत्नी बरोबर फोनवर बोलणे झाले. त्याची कॉल रेकॉर्डींग समोर आली आहे. त्यात हे दोघे जोरादार भांडण करत आहेत. शिवाय एकमेकाला शिवीगाळ करत आहेत. एकमेकांवर दोघांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर खुराणा यांनी राहत्या घरी गळफास घेतला. या आत्महत्येला त्यांची पत्नी जबाबदार असल्याचा आरोप खुराणा यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुनीत यांचे त्यांची पत्नी मणिका बरोबर पटत नव्हतं. त्यांच्यातले संबध चांगले नव्हते. ते दोघे घटस्फोट घेणार होते. त्यांची केसही सुरू होती. मात्र पत्नीने इतका धळ केला की पुनीत यांनी टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्यच संपवलं. पुनीत हे 40 वर्षाचे होते. हा एक प्रकारे खून असल्याचा आरोप पुनीत यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या दोघांमधीली फोन रेकॉर्डींग पाहीलं असता या दोघांमधील संबधी किती टोकाला पोहोचले होते हे लक्षात येते. पुनीत यांची आई आपल्या मुलाला पैशांसाठी त्रास दिली जात होता असा आरोप केला आहे. आपला मुलगा साधा होता. त्याला दिवस रात्र त्रास दिली गेला असा आरोप त्यांनी केलाय.
पुनीत आणि त्यांची पत्नी मणिका यांच्यातील शेवटची बातचीत काय झाली हे ही समोर आले आहे. पुनीत यांचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाले होते. ते पत्नी मणिका यांनी केल्याचा त्यांचा आरोप होता. मात्र आपण कोणतेह अकाऊंट हॅक केले नाही असं मणिका यांचं म्हणणं आहे. पुनीत म्हणतात तु माझ्या कुटुंबा बरोबर चांगली वागली नाहीस. त्यावर ती त्याला म्हणते की तु आता मला पत आत्महत्या करणार याची धमकी दे. बिझनेस काढून घेईन हे सांग. त्यावर तूला काय हवं आहे अशी विचारणा पुनीत यांनी केली. त्यावर उद्या घरी ये मग सांगते अशा धमकीच्या स्वरूपात ती त्यांच्या बरोबर बोलते. पण पुनीत याने आपण तुला भेटणार नाही असं स्पष्ट केलं. त्यानंतर तीनं पुनीत यांना उकसवलं. समोर येण्याची हिंमत नाही, आणि रात्री तीन वाजता फालतू बडबड करत आहेस अशा शब्दात त्यांना फटकारलं.
मी तुझ्या व्यवसायात अजूनही भागिदार आहे. त्यामुळे मला त्याचा मोबदला मिळाला पाहीजे असा तिचा आग्रह होता. त्यासाठी ती पुनीत यांच्या मागे लागली होती. तर मणिकाने पुनीत याचं बाहेर प्रेम प्रकरण होतं असा आरोप केला. मात्र आपलं कुठेही काही नाही असं त्याने स्पष्ट केलं होतं. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. दोघे ही एकमेकाला शीव्या देत होते. पत्नी मणिका पतीला पुनीतला शीव्या देत सुटली. त्यावर तुला सकाळी मी काय करतो ते बघ. तुझा खरा चेहरा जगा समोर आणतो. सर्व काही यु ट्यूबवर टाकतो अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने फोन कट केला.
त्यानंतर त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. दोघांमध्ये भांडणं होती असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे. शिवाय त्यांची घटस्फोटाची केसही सुरू असल्याचं ते म्हणाले. या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या दोघांमध्ये संपत्तीवरूनही वाद होता हे समोर आले आहे. त्याच बरोबर पुनीत काही ट्रीटमेंट घेत होते त्याचीही चौकशी आपण करणार असल्याचे पोलिसांनी सागितले आहे.