Gautam Gambhir, IND vs AUS : मेलबर्न टेस्टमधील टीम इंडियाच्या पराभवानंतर हेड कोच गौतम गंभीर अत्यंत निराश झाला आहे. या पराभवाचे जोरदार पडसाद भारतीय ड्रेसिंग रुममध्ये उमटले. 'इंडियन एक्स्प्रेस' नं दिलेल्या वृत्तानुसार, चौथ्या टेस्टमधील पराभवानंतर गंभीरनं भारतीय खेळाडूंना ड्रेसिंग रुममध्ये जोरदीर फटकारलंय.
गंभीरनं सीनिअर खेळाडूंवर नाराजी व्यक्त केलीय. त्याचबरोबर टीममधील ड्रेसिंग रुममधील वातावरण चांगलं नसल्याचंही या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलंय. काही खेळाडू 'चर्चा करुन निश्चित केलेल्या योजनांपेक्षा' स्वत:च्या मर्जीनं काम करत आहेत. बांगलादेशविरुद्ध भारतामध्ये झालेल्या सीरिजनंतर काही महिन्यांपासून भारतीय टीमची कामगिरी घसरली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गंभीरला हवा होता पुजारा!
या रिपोर्टनुसार, 'ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या टेस्टपूर्वी टीम इंडियात चेतेश्वर पुजाराचा समावेश करावा, अशी मागणी कोच गौतम गंभीरनं केली होती. पुजाराला 100 पेक्षा जास्त टेस्टचा अनुभव आहे. पर्थमध्ये टीम इंडियानं विजय मिळवल्यानंतरही पुजाराचा टीममध्ये समावेश करावा, अशी मागणी गंभीरनं केली होती.
आता खूप झालं...
मेलबर्न टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा 184 रननं पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं सीरिजमध्ये 2-1 अशी आघाडी घेतलीय. या टेस्टमधील टीमच्या कामगिरीवर गंभीर चांगलाच नाराज झाला होता. गंभीर ड्रेसिंग रुममध्ये खूप संतापलेला होता. 'आता खूप झालं...' असं गंभीरनं ड्रेसिंगरुममध्ये खेळाडूंना सुनावलं असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : IND vs AUS: विराटनं यशस्वी जैस्वालला रन आऊट केलं? मांजरेकर-इरफान पठाणमध्ये जोरदार वाद, Video )
रणनितीचं पालन करा
टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील रणनितीचं मैदानात पालन होत नसल्याबद्दल गौतम गंभीरनं नाराजी व्यक्त केली. जे खेळाडू रणनितीचं पालन करणार नाहीत, त्यांना 'धन्यवाद' दिलं जाईल, असा इशारा गंभीरनं टीमला दिला आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सीरिजमधील पाचवी आणि शेवटची टेस्ट 3 जानेवारीपासून सिडनीमध्ये सुरु होत आहे. टीम इंडिया या सीरिजमध्ये 1-2 ने पिछाडीवर आहे. आता सीरिजमध्ये बरोबरी करुन बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्याकडंच राखण्यासाठी भारतीय टीमला सिडनी टेस्ट जिंकावीच लागेल.
( नक्की वाचा : World Record : 15 फोर आणि 11 सिक्स ! 17 वर्षांच्या मुंबईकरनं उडवली सर्व आयपीएल टीमची झोप )
गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाची खराब कामगिरी
गौतम गंभीर टीम इंडियाचा कोच झाल्यापासून टीम इंडियाची कामगिरी घसरली आहे. भारतीय टीमनं दुबळ्या बांगलादेशचा 2-0 असा सरळ पराभव केला. पण, त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धची सीरिज 0-3 नं गमावली. तब्बल 12 वर्षानंतर टीम इंडियानं मायदेशात टेस्ट सीरिज गमावली आहे. त्याचबरोबर सध्या ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमध्येही टीम इंडिया 1-2 नं पिछाडीवर आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world