देवरी-चिचगड मार्गावर दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचे धडापासून डोकं वेगळं झाल्याची धक्कादायक घटना सालईजवळ घडली. या अपघातानंतर अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. अपघातात तरुणाचं डोके कसं कापलं जाऊ शकतं, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नक्की वाचा - Road Accident : भाजपच्या माजी आमदारांच्या नातवाचा भीषण अपघातात मृत्यू, केचे कुटुंबावर दु:खाचा डोंगर
मात्र या विचित्र अपघातात दुचाकीस्वाराचं डोकं धडापासून वेगळे झाल्याने हा अपघात की घातपात अशी शंका व्यक्त केली जात आहे. निकेश आत्माराम कराडे (32) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार निकेश हा त्याच्या दुचाकी क्रमांक एमएच 35 एव्ही 2968 ने देवरीवरून आपल्या गावाकडे जात होता. दरम्यान सालईजवळ त्याच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात निकेशचं डोकं धडापासून वेगळं झालं होतं. त्यामुळे हा अपघात की घातपात अशी शंका व्यक्त केली जात आहे. पुढील तपास देवरी पोलीस करीत आहे.