धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाथरूड येथे प्रेम प्रकरणातून मारहाण झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान सोलापूर येथे मृत्यू झाला आहे. माऊली गिरी असं या तरुणाचं नाव आहे. पांढरेवाडी येथील सात ते आठ जणांनी 3 मार्च रोजी दुपारी दोन ते अडीच वाजता रॉड, काठीने अमानुषपणे त्याला मारहाण केली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माऊलीच्या पाठीपासून पायापर्यंत रोडने प्रहार करून बेदम मारहाण करण्यात आली होती. त्याच्या गुप्तांगाला देखील तीक्ष्ण वस्तूने इजा करण्यात आली होती. या मारहाणीत त्याला मृत झाल्याचं समजून फेकून देण्यात आलं होतं आणि आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणावर सोलापूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या काळात तो बेशुद्ध अवस्थेतच आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत होता. उपचारादरम्यान 14 दिवसांनी या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
नक्की वाचा - Beed Crime : 'ही माणसं आहेत की जनावरं?' बीडमध्ये 25 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू, 2 दिवस डांबून जबर मारहाण
प्रेम प्रकरणातून मारहाण झाल्याची होती चर्चा..
8 मार्च रोजी या प्रकरणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुख्य आरोपी सतीश जगताप यांच्यासह इतर सात जणांवर आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मारहाण का झाली हे या फिर्यादीत नमूद करण्यात आलं नव्हतं. माऊली गिरी याचे एका विवाहित महिलेसोबत प्रेम संबंध असल्याने ही मारहाण झाल्याची चर्चा होती. यासंदर्भात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. तसेच इतर आरोपींचा देखील पोलिसांकडून शोध सुरू आहे.