
ओंकार कुलकर्णी, धाराशिव: काही दिवसांपूर्वी धाराशिवमधील लोक मंगल कॉपरेटिव्ह बँकेच्या मॅनेजरवर चाकूहल्ला करत 25 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना घडली होती. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र आता या प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट आला असून ही चोरी झाली नसून बँक मॅनेजरनेच आर्थिक अडचणीतून हा सगळा कट रचल्याचे उघडकीस आले आहे.
(नक्की वाचा- Ahilyanagar News : महिलांना आमिष देऊन ढाबा, बारमध्ये नाचवायचा; भाजप पदाधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार)
ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे गमावलेल्या बँक मॅनेजरने आर्थिक अडचणीतून बँकेत चोरी झाल्याचा बनाव करत 25 लाख रुपये लंपास केले. एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी घटना धाराशिव जिल्ह्यामध्ये घडली आहे. याप्रकरणी कैलास मारुती घाटे याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास करत बँक मॅनेजरकडून चोरीची रोकडही जप्त केली आहे.
त्याचं झालं असं की, ऑनलाईन गेमिंगमध्ये तो कंगाल झाला. पैसे मिळवण्यासाठी चोरीचा प्लॅन आखला. जिथे काम करतो त्याच बँकेचे पैसे चोरट्यांनी हल्ला करून लंपास केल्याची कहानी रचली. त्यासाठी स्वतः वर चाकू हल्ला करून घेतला. मात्र पोलीस तपासात बिंग फुटलं चोरी झालीच नाही हे समोर आले. धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील हा सारा प्रकार एखाद्या चित्रपटाला शोभेल असा आहे.
Pune News : पुणे हादरलं! तरुणीवर घरात घुसून अत्याचार, कुरिअर बॉयची 'परत येईन' अशी धमकी
लोकमंगल को-ऑपरेटिव बँकेत बँक मॅनेजर असणाऱ्या कैलास मारुती घाटे यांनी ही कहाणी रचली. ऑनलाइन गेमिंगमध्ये पैसे हरल्यानंतर घाटे यांनी बँकेची 25 लाख लंपास केले. पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी स्वतःवर चाकू हल्ला केला अन् चोरट्याने डोळ्यात मिरची पूड फेकत 25 लाख लंपास केल्याचं सांगितलं. मात्र पोलीस तपासात बिंग फुटले. घाटे यांनी हा सगळा प्लॅन आखल्याच समोर आल, यांच्याकडून 25 लाख वसूल करण्यात आले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world