धक्कादायक! गुदद्वारात कॉम्प्रेसरने भरली हवा, लहान मुलासोबत घडला भयंकर प्रकार

गॅरेजमध्ये काम करणाऱ्या मुलाच्या गुदद्वारात दोघांनी कॉम्प्रेसरने हवा भरली आणि पुढे जे काही घडलं ते भयानक होते.

Advertisement
Read Time: 2 mins

नागिंद मोरे, धुळे

धुळ्यामध्ये एका चित्रविचित्र घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गॅरेजमध्ये काम करणाऱ्या मुलाच्या गुदद्वारात दोघांनी कॉम्प्रेसरने हवा भरल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. धुळ्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल सिटी पॉइंटच्या परिसरातील गॅरेजमध्ये ही घटना घडली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मृत पावलेल्या मुलाचे नाव मोहम्मद खालिक मोहम्मद गनिब असे होते. 14 वर्षीय मोहम्मदसोबत झालेल्या वादातून हा धक्कादायक प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे.  याप्रकरणी मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

(नक्की वाचा: संतापजनक! तक्रार नोंदवायला आलेल्या तरुणीकडे पोलिसानंच केली शरीर सुखाची मागणी)

गॅरेजमध्ये काम करणाऱ्या रोहित चंद्रवंशी (वय 23 वर्ष) व शिवाजी सुळेने (वय 23 वर्ष) मोहम्मदच्या गुदद्वारात हवा भरली. कॉम्प्रेसरने हवा भरल्याने त्याच्या शरीराच्या आतील अवयवांना इजा झाली. यानंतर मोहम्मदला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रोहित चंद्रवंशी व शिवाजी सुळे या दोघांना मोहाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

नेमके काय घडले?

"मोटार गॅरेजच्या दुकानात रोहित आणि शिवाजी बसलेले होते. तेथे मोहम्मद खालिक मोहम्मद गनिब देखील होता. यावेळेस त्यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाला आणि यातील एकाने मोहम्मदचा हात पकडला तर दुसऱ्याने कॉम्प्रेसरने त्यांच्या पार्श्वभागामध्ये हवा भरली. हवा थेट त्याच्या पोटात गेली. यानंतर मोहम्मदला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याने शेवटचा श्वास घेतला", अशी माहिती पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी दिली आहे. 

(नक्की वाचा: मोठी कारवाई! नारायणपूरमध्ये झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार, 3 जवान जखमी)

Nashik Water Crisis | नाशकात पाणीप्रश्न गंभीर, नाशिककरांवर पाणीटंचाईची टांगती तलवार 

Topics mentioned in this article