जाहिरात
Story ProgressBack

संतापजनक! तक्रार नोंदवायला आलेल्या तरुणीकडे पोलिसानंच केली शरीर सुखाची मागणी 

भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका तरुणीने केला आहे.

Read Time: 2 mins
संतापजनक! तक्रार नोंदवायला आलेल्या तरुणीकडे पोलिसानंच केली शरीर सुखाची मागणी 

- तेजस मोहतुरे, भंडारा 

Bhandara Crime: पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा संतापजनक प्रकार भंडाऱ्यामध्ये घडला आहे. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला गेलेल्या तरुणीकडे पोलिसानंच शरीर सुखाची मागणी केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका तरुणीने केला आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून अशोक बागुल यांच्या विरोधात भंडारा पोलीस स्टेशनमध्ये भादंवी कलम 354 A(2), 509 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

(नक्की वाचा: गुटखा कारखान्यावरील धाडीत 44 लाखांचा मुद्देमाल जप्त, लातूर पोलिसांची मोठी कारवाई)

नेमके काय आहे प्रकरण?

पीडित तरुणी उच्च शिक्षित आहे. शिक्षण घेत असताना तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. सात वर्षे ते दोघे नातेसंबंधात होते, यादरम्यान तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पण लग्नाचा विषय काढल्यानंतर तो सातत्याने उडवाउडवीचे उत्तर देत होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच न्याय मिळवण्यासाठी तरुणी 1 जून रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अशोक बागुल यांच्या कार्यालयात धाव घेतली. पण यावेळेस जे काही घडले ते अतिशय चीड आणणारे होते. 

(नक्की वाचा: कल्याणमध्ये प्रवचनकार महाराजाचा महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल)

यावेळेस बागुल यांनी तिला केबिनमध्ये बसवले आणि "तू सुंदर आहे. आत्महत्या करू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. मी तुला मदत करतो. पण माझी एक अट आहे. तू आणि मी जवळचे मित्र होऊ. तुझे आयुष्य बदलेन. तू सुशिक्षित आणि सुंदर आहे. मी अजूनही तरुण आहे. आपण डेटवर जाऊ. तू मला त्यासाठी मदत कर. मी तुला कधीच एकटे सोडणार नाही. माझ्या वयावर जावू नकोस. मी तुला आयुष्यभर सांभाळेन. हे तू कोणाला सांगू नकोस", असे म्हणज बागुल यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.  

(नक्की वाचा: 6 महिन्याच्या बाळाची चोरी, चक्र फिरली, 24 तासात 'असा' लागला शोध)

भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचं जाणवल्याने पीडितेने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादवी 354 A (2), 509 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Lok Sabha 2024 Results | लंकेंचे PA निशाण्यावर, लोकसभा निकालानंतर नगरमध्ये मोठा राडा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
मोठी कारवाई! नारायणपूरमध्ये झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार, 3 जवान जखमी
संतापजनक! तक्रार नोंदवायला आलेल्या तरुणीकडे पोलिसानंच केली शरीर सुखाची मागणी 
dhule 14 year old boy dies after filling air in his rectum with compressor two arrested
Next Article
धक्कादायक! गुदद्वारात कॉम्प्रेसरने भरली हवा, लहान मुलासोबत घडला भयंकर प्रकार
;