Crime News: रात्रभर बेदम मारहाण, पैशांची मागणी; प्रेमप्रकरणातून तरुणाला हाल-हाल करुन मारलं, पुढे जे घडलं...

घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले.

जाहिरात
Read Time: 2 mins
धुळे:

नागिंद मोरे

शिरपूर तालुक्यातील उमर्दा येथील चार युवक काळपाणी गावात गेले होते. त्यातील एका मित्र त्याच्या मैत्रिणीला भेटणार होता. मात्र याची माहिती या गावातल्या त्यांच्या नातेवाईकांना लागली. त्यानंतर काळपाणी गावातील गावकऱ्यांनी या चौघा युवकांना पकडलं. त्यानंतर संपूर्ण रात्रभर एका घरात डांबून ठेवले. त्यावेळी या चौघांनाही  जबर मारहाण करण्यात आली. ही मारहाण इतकी जबर होती की त्यात  एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झालेल्या युवकाचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला. त्यानंतर जे काही घडलं ते सर्व अंगावर काटा आणणारं होतं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उमर्दा गावातील वीस वर्षीय युवक कमलसिंग पावरा आपल्या मित्रांसोबत काळपाणी गावात आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला होता. गावातील त्या मुलीच्या नातेवाईकांना याबाबत माहिती मिळाली. त्यातून त्यांनी या चारही तरुणांना एका घरात डांबून ठेवले. शिवाय या चौघांनाही रात्रभर बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर उमर्दा गावातील ग्रामस्थांना यासंदर्भात माहिती दिली. आपल्या मुलांना येथून सुखरूप घेऊन जायचं असेल तर, प्रत्येकी पाच हजार रुपयेची मागणी काळपाणी गावातील नागरिकांनी केली. यानंतर गावातील काही लोकांनी मध्यस्थी करत यापैकी तीन तरुणांची सुटका करून घेतली.  कमलसिंग पावरा याच्या संदर्भात विचारले असता काळपाणी गावातील नागरिकांनी तो रात्रीच येथून पळून गेल्याचे सांगितले. 

ट्रेंडिंग बातमी - DCM एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे कोण? का दिली धमकी?

प्रत्यक्षात जबर मारहाणीत कमलसिंग पावरा या तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर उमर्दा गावातील नागरिकांनी व नातेवाईकांनी कमलसिंग पावरा याचा शोध घेतला. या  दोन्ही गावांच्यामध्ये असलेल्या एका नाल्यामध्ये त्याचा मृतदेह  आढळून आला. त्याच्या मृतदेहावर मारहाणीच्या खुणा होत्या. त्याला जबर मारहाण झाल्याचे दिसत होते. याच मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. शिवाय त्याला ठार करून नाल्यात फेकल्याचेही त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. 

ट्रेंडिंग बातमी - Saffron farming: संत्र्यांच्या नागपुरात चार भिंतीत आता केसर शेती, हा करिश्मा कसा झाला?

यानंतर घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. कमलसिंग पावरा याचा मृतदेह पुढील कारवाईसाठी ताब्यात घेत शिरपूर येथे पाठवला. कमल सिंग पावरा याच्या मृतदेहावर शवविच्छेदन झाल्यानंतर गावातील संतप्त नातेवाईकांनी कमल सिंग पावरा याचा मृतदेह थेट काळपाणी गावात नेला. ज्यांनी त्याला मारहाण केली, त्यांच्या घरासमोरच त्यांनी त्याच्यावर अंत्यविधी केले. शिवाय संतप्त नातेवाईकांनी संशयित आरोपींच्या घराची तोडफोड केली. या संपूर्ण प्रकरणी  खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तर सहा जण फरार आहेत.  

Advertisement