Dhule News: चोराच्या हाताला AI ची साथ; धुळ्यात कोर्टाच्या परीक्षेत कॉपी करण्यासाठी लढवली 'ही' अजब शक्कल

Dhule News: सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय तंत्रज्ञानाचा वापर चक्क परीक्षेतील चोरीसाठी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dhule News: धुळे शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि तितकीच खळबळजनक बातमी समोर आली आहे. (प्रतिकात्मक फोटो)
धुळे:

नागिंद मोरे, प्रतिनिधी

Dhule News: धुळे शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि तितकीच खळबळजनक बातमी समोर आली आहे. सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय तंत्रज्ञानाचा वापर चक्क परीक्षेतील चोरीसाठी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उच्च न्यायालयाच्या भरती प्रक्रियेतील परीक्षेत एका उमेदवाराने मोबाईल आणि एआयच्या मदतीने उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरारी पथकाच्या सतर्कतेमुळे हा हायटेक गैरप्रकार रंगेहात पकडला गेला आहे.

काय आहे प्रकरण?

ही घटना धुळे शहरातील जिजामाता कन्या हायस्कूल येथील परीक्षा केंद्रावर घडली. येथे उच्च न्यायालयातील लिपिक आणि शिपाई पदांसाठी लेखी परीक्षा सुरू होती. सर्व उमेदवार पेपर सोडवण्यात मग्न असताना नाजीब अली तबसुम सय्यद नावाच्या उमेदवाराच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. 

Advertisement

भरारी पथकाने बारीक लक्ष ठेवले असता, या उमेदवाराने अतिशय चतुराईने परीक्षा केंद्रावर मोबाईल नेल्याचे आणि त्याचा वापर करून उत्तरे शोधत असल्याचे निदर्शनास आले.

( नक्की वाचा : KDMC News: केडीएमसीमध्ये लाचखोरीची पन्नाशी पूर्ण! 40 हजारांसाठी लिपिकाने स्वाभिमान विकला )
 

एआयच्या मदतीने उत्तरे शोधण्याचा प्रयत्न

या प्रकरणातील सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे या उमेदवाराने केवळ मोबाईलचा वापर केला नाही, तर त्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला. त्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ते इंटरनेटवर अपलोड केले होते. 

विशेष म्हणजे 'गुगल' आणि एआय आधारित साधनांच्या मदतीने या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. तंत्रज्ञानाचा असा गैरवापर पाहून परीक्षा घेणारे अधिकारी आणि पोलीसही चक्रावून गेले आहेत.

भरारी पथकाने संशय येताच तात्काळ परीक्षा पर्यवेक्षकांना याची माहिती दिली. त्यानंतर संबंधित उमेदवाराची कसून तपासणी केली असता त्याच्याकडे मोबाईल फोन सापडला आणि हा सर्व प्रकार उघड झाला. यानंतर नाजीब अली तबसुम सय्यद याच्या विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Pune News: कॅब चालकाच्या सतर्कतेमुळे अमेरिकन नागरिकांचा डाव फसला; पुणे पोलिसांची मोठी कारवाई, प्रकरण काय? )
 

पुढील कारवाई सुरू

या प्रकरणाबाबत माहिती देताना पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे यांनी सांगितले की, उमेदवाराला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. परीक्षा केंद्रावर इतकी कडक सुरक्षा असतानाही मोबाईल आत गेलाच कसा आणि यामागे आणखी कोणाचे हात आहेत का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
 

Topics mentioned in this article