जाहिरात

Pune News: कॅब चालकाच्या सतर्कतेमुळे अमेरिकन नागरिकांचा डाव फसला; पुणे पोलिसांची मोठी कारवाई, प्रकरण काय?

Pune News: पुणे शहरात पर्यटनाच्या नावाखाली आलेल्या परदेशी नागरिकांनी व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Pune News: कॅब चालकाच्या सतर्कतेमुळे अमेरिकन नागरिकांचा डाव फसला; पुणे पोलिसांची मोठी कारवाई, प्रकरण काय?
Pune News: पुण्यातील कॅब चालकांना या अमेरिकन नागरिकांचा पहिल्यांदा संशय आला. (प्रतिकात्मक फोटो)
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune News:  पुणे शहरात पर्यटनाच्या नावाखाली आलेल्या परदेशी नागरिकांनी व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टुरिस्ट व्हिसावर असताना पुण्याच्या वेगवेगळ्या भागात धार्मिक प्रचार आणि पत्रकांचे वाटप केल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिसांनी ठेवला आहे. या कारणामुळे पोलिसांनी 3 अमेरिकन नागरिकांना तातडीने भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेली माहिती अशी की, हे ३ ही अमेरिकन नागरिक साधारणपणे 53, 65 आणि 66 वयोगटातील आहेत. हे नागरिक 19 ते 21 एप्रिल 2026 या कालावधीत टुरिस्ट व्हिसावर पुण्यात दाखल झाले होते. नियमानुसार टुरिस्ट व्हिसावर आलेल्या व्यक्तीला केवळ फिरण्यासाठी परवानगी असते, मात्र हे नागरिक धार्मिक उपक्रमांमध्ये सक्रिय असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

कॅब चालकाची सतर्कता

हे तिघेही अमेरिकन नागरिक 26 एप्रिलपासून पिंपरी चिंचवडमधील एका हॉटेलमध्ये मुक्कासाला होते. मात्र, 27 एप्रिल रोजी सकाळी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शुक्रवार पेठेत त्यांनी एका खासगी कॅब चालकाला गाठले. तिथे त्यांनी इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत छापलेली धार्मिक पत्रके वाटण्यास सुरुवात केली. 

या पत्रकांमध्ये बायबल आणि ख्रिश्चन धर्माविषयी माहिती होती. संबंधित कॅब चालकावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, त्याला संशय आला आणि त्याने तिथे ड्युटीवर असलेल्या पुणे पोलिसांना याची माहिती दिली.

( नक्की वाचा : Akola News: अकोल्यातल्या मजुराची मुलगी बनली सरकारी अधिकारी, कोणत्याही ट्युशनशिवाय झाली 3 परीक्षा पास! )

पुणे पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे

माहिती मिळताच पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे विविध भाषांमधील धार्मिक पत्रकांचा मोठा साठा सापडला. त्यांच्या पासपोर्ट आणि व्हिसाची तपासणी केली असता, ते टुरिस्ट व्हिसावर असल्याचे स्पष्ट झाले. टुरिस्ट व्हिसावर असताना कोणत्याही प्रकारचा धार्मिक प्रचार करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यानंतर या तिघांची कसून चौकशी करण्यासाठी त्यांना परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयात (FRO) नेण्यात आले.

 देश सोडण्याचे आदेश

पुणे पोलीस उपायुक्त संदिप भाजीभाकरे यांनी या प्रकरणाची अधिकृत माहिती दिली आहे. इमिग्रेशन आणि फॉरेनर्स कायद्यानुसार या तिघांनाही ‘लीव्ह इंडिया नोटीस' बजावण्यात आली आहे. या नोटीस नुसार त्यांना 10 मे 2026 पर्यंत भारत सोडून मायदेशी जाण्याचे आदेश दिले आहेत. पुण्यात यापूर्वीही जुलै 2025 मध्ये अशाच प्रकारे एका अमेरिकन नागरिकावर कारवाई करण्यात आली होती, त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच प्रकार उघड झाला आहे.

( नक्की वाचा : Shocking: आईच्या बँक खात्यातील 45 लाख रुपयांवर डोळा; मुलीनं प्रियकर अरबाजच्या मदतीनं असा रचला मृत्यूचा सापळा )

पुणे शहरात परदेशी नागरिकांच्या हालचाली वाढल्या असून, व्हिसा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुणे पोलीस आता कठोर कारवाई करत आहेत. कॅब चालक आणि नागरिकांनी अशा संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com