Dhule News: बहिणीचं लग्न, मंडप सजला! त्याच वेळी भावा सोबत भयंकर घडलं, सगळं लग्न घर ढसाढसा रडलं

रोशन हा दोन भावांपैकी लहान होता. त्याने नुकतीच 12 वीची परीक्षा दिली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • धुळ्याच्या साक्री तालुक्यातील बोरगाव गावात बहीणीच्या लग्ना आधी भावाचा मृत्यू
  • रोशनचा झाडावरून फांद्या तोडताना इलेक्ट्रिक मेन लाईनच्या तारांना स्पर्श झाला आणि त्याला जबर झटका बसला
  • या दुर्दैवी घटनेमुळे लग्न घरात आनंदाचे वातावरण एका क्षणी शोककळेत परिवर्तित झाले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
धुळे:

नागिंद मोरे

बहिणीच्या लग्नाची तयारी करत असलेल्या भावा सोबत भयंकर घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे. बहिणीचं लग्न ठरलं होतं. घरा समोर मांडव ही सजला होता. लग्न घरात पाहुण्यांची रेलचेल होती. सर्व जण खुश होते. लग्नाच्या तयारीत सर्वच जण गुंतले होते. त्यात नवरीचा भाऊ ही होता. त्याच वेळी त्याच्यावर काळाने घाला घातला. 17 वर्षाच्या भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना लग्न घरात येताच आनंदाचं वातावरण एकदम  दुख:त बदललं. सर्व लग्न घरावर शोककळा पसरली. कोणी स्वप्नात ही कल्पना केली नसेल अशी घटना घडली. धुळ्याच्या साक्री तालुक्यात ही घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.   

साक्री तालुक्यातील बोरगाव येथे ही धक्कादायक घटना घडली. रोशन ठाकरे हा आपल्या चुलत बहिणीच्या लग्नाची तयारी करत होता. तो 12 वीमध्ये शिकत होता. त्याचं वय अवघं 17 वर्षांचं होतं. लग्न घरात उंबऱ्याला लावण्यासाठी झाडाच्या फांद्यांची गरज होती. या फांद्या आणण्याची जबाबदारी रोशननं आपल्याकडे घेतली. त्यानुसार तो फांड्या आणण्यासाठी गेला. रोशन फांद्या तोडण्यासाठी झाडावर चढला. त्याच झाडाच्या वरून इलेक्ट्रिक मेन लाईनच्या तारा गेल्या होत्या. त्या  रोशनच्या नजरेस पडल्या नाहीत. 

नक्की वाचा -  Pune News: 'जेव्हा केंव्हा वेळ येईल त्या वेळी कापून काढीन' खासदार मेधा कुलकर्णी हे काय बोलल्या

फांदी तोडत असतानाच विजेच्या तारेला स्पर्श त्या फांद्यांना झाला. त्या फांद्या रोशनच्या हातात होत्या. त्याच वेळी रोशनला विजेचा शॉक लागला. या धक्क्याने रोशन थेट जमिनीवर कोसळला. त्याला जबर झटका बसला होता. नातेवाईकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर रोशनला मृत घोषित केले. संपूर्ण कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता. तिथेच कुटुंबीयांनी टाहो फोडला. संपूर्ण लग्न घरावर शोककळा पसरली. शिवाय बोरगाव परिसरात शोककळा पसरली.

नक्की वाचा - Maha Budget 2026: सरकारची कर्जमाफीची घोषणा! 'या' शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार, काय आहेत नियम अन् अटी?

रोशन हा दोन भावांपैकी लहान होता.  त्याने नुकतीच 12 वीची परीक्षा दिली होती. त्याचे आई-वडील आणि मोठा भाऊ शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ज्या घरात आज मांडव आणि उद्या लग्न असल्याने आनंदाचे वातावरण होते, तिथे आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत युवकाचा मृतदेह पिंपळनेर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला होता. पोलीस तिथे आले होते. या प्रकरणाचा पोलीस आता तपास करणार आहेत. मात्र लग्न घरात ही घटना घडल्याने त्यांनाही शॉक लागला आहे.  

Advertisement

नक्की वाचा - Maha Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली? पैसे वाढले का?