नागिंद मोरे, प्रतिनिधी
Dhule News : साक्री तालुक्यातील गणेशपूर येथील निवासी आश्रम शाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना अचानकपणे थंडी, ताप, खोकला, सर्दीच्या आजाराने लागण झालेल्या 61 विद्यार्थी, विद्यार्थिनींना साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर उपचारादरम्यान सोनाली सुनील पावरा या12 वर्षांच्या (खरवड तालुका, धडगाव जिल्हा, नंदुरबार) विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान चार विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असून त्यांना पुढे उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून देण्यात आली. तर इतर विद्यार्थ्यांना उपचार करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून इतर विद्यार्थ्यांना आश्रम शाळेत पाठवण्यात आले आहेत.
नक्की वाचा - Beed Crime: हत्या की आत्महत्या? आधी वडील मग 3 वर्षांच्या चिमुकलीचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
साक्री तालुक्यातील गणेशपुर येथे निवासी आश्रम शाळा चालवली जाते. या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अचानकपणे गेल्या दोन दिवसापासून विद्यार्थ्यांना थंडी, तापच्या आजाराने ग्रासले असल्याची माहिती शाळा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. यावेळी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचारासाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.