Diamond and gold caught : मुंबई विमानतळावर कस्टम विभागानं मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत नूडल्सच्या पाकिटात लपवलेले हिरे तसंच अंडरगार्मेंट्समधून आणलेलं सोनं जप्त करण्यात आलं आहे. या कारवाईत तब्बल 6.46 कोटींचा माल जप्त करण्यात आलाय, अशी माहिती आहे. कस्टम विभागानं सोमवारी रात्री जाहीर केलेल्या पत्रकामध्ये ही माहिती दिलीय. त्यानुसार 4.44 कोटी किंमतीचं 6.8 किलो ग्रॅम सोनं आणि 2.02 कोटी रुपयाचे हिरे जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात 4 प्रवाशांना अटक करण्यात आलीय.
त्यानंतर या प्रवाशालाही अटक करण्यात आली. कस्टम विभागानं दिलेल्या माहितीनुसार कोलंबोहून मुंबईला प्रवास करणाऱ्या एका विदेशी नागरिकाला अडवण्यात आलं. त्यानं स्वत:च्या अंडरगार्मेंट्समध्ये सोन्याच्या विटा लपवल्या होत्या. या सोन्याच्या विटांचं वजन 321 ग्रॅम होते.
बाबा चिडले म्हणून दोन्ही मुलांनी घर सोडलं; चिंताग्रस्त पालकांची पोलीस ठाण्यात धाव
त्याचबरोबर दुबई आणि अबूधाबीला जाणारे प्रत्येकी 2, बहरीन, दोहा, रियाध, मस्कत, बँकॉक आणि सिंगापूरला जाणाऱ्या प्रत्येकी 1 अशा एकूण 10 प्रवाशांना अडवण्यात आलं. त्यांच्याकडून 6.199 किलो ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं. त्याची किंमत 4.04 कोटी रुपये आहे. यामधील तीन जणांना अटक करण्यात आली आहे.