UP Crime News: पाहुणा म्हणाला, 'जेवण चांगलं नाही', नवरीच्या काकाने भर मंडपात गोळ्या घातल्या!

तात्काळ कारवाई करत आरोपी विजय कुमारला अटक केली आहे.  पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

उत्तरप्रदेश: लग्नसोहळा म्हणजे पाहुणे मंडळींची कुरबुर, रुसवे- फुगवे आलेच. लग्नात मान- अपमान, नाराजीनाट्य आणि रुसवे फुगवे काही नवीन नाहीत. मात्र याच नाराजीमुळे नवरीच्या काकाने सर्वांसमोर नवरदेवाच्या नातेवाईकाला गोळ्या घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तरप्रदेशच्या कासगंजमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लग्नासाठी आलेल्या नवरदेवाच्या नातेवाईकाची मंडपातच निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरदेवाच्या नातेवाईकाने जेवण चांगलं झालं नाही म्हणून कुरबुर केली आणि त्यावरुनच संतापलेल्या नवरीच्या काकाने पिस्तुल काढून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. उत्तरप्रदेशमधील कासगंज जिल्ह्याच्या सहावरमध्ये ही घटना घडली. 

 सहवार परिसरातील रोशन नगरमध्ये राहणाऱ्या रुमाल सिंग यांची मुलगी काजोलचे लग्न होते. हाथरसच्या वस्तोई गावातून लग्नाचे वह्राड आले होते. रात्री सर्व वऱ्हाड्यांचे जेवण सुरु असतानाच नवरदेवाच्या नातेवाईकाने जेवणाबाबत कुरबुर केली. यावरुनच त्याचा नवरीचे काका विजय कुमार यांच्याशी वाद झाला. 

( नक्की वाचा :  EXPLAINED : RCB नं IPL 2025 साठी विराट कोहलीची कॅप्टन म्हणून निवड का केली नाही? )

याच वादातून रागाच्या भरात विजय कुमार याने त्या नातेवाईकाला पिस्तूल काढून थेट गोळी झाडली. ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत अरुण कुमार हाथरसच्या गिलोली गावचा रहिवासी होता. गोळीबाराचा आवाज ऐकून लग्नघरात एकच खळबळ उडाली.  एकीकडे विवाह सोहळ्याचा आनंद सुरु असतानाच घडलेल्या या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली. 

 दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी तात्काळ कारवाई करत आरोपी विजय कुमारला अटक केली आहे.  पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.