जाहिरात

EXPLAINED : RCB नं IPL 2025 साठी विराट कोहलीची कॅप्टन म्हणून निवड का केली नाही?

New RCB Captain : आजवर एकही आयपीएल विजेतेपद न पटकावूनही फॅन्समध्ये लोकप्रिय असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुनं (Royal Challengers Bengaluru, RCB) आगमी आयपीएल सिझनसाठी (IPL 2025) कॅप्टन निवडला आहे.

EXPLAINED : RCB नं IPL 2025 साठी विराट कोहलीची कॅप्टन म्हणून निवड का केली नाही?
मुंबई:

आजवर एकही आयपीएल विजेतेपद न पटकावूनही फॅन्समध्ये लोकप्रिय असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुनं (Royal Challengers Bengaluru, RCB) आगमी आयपीएल सिझनसाठी (IPL 2025) कॅप्टन निवडला आहे. टीमनं मध्य प्रदेशचा कॅप्टन आणि आक्रमक खेळाडू रजत पाटीदारची (Rajat Patidar) कॅप्टन म्हणून निवड केली आहे. आरसीबीच्या कॅप्टनपदासाठी विराट कोहलीचं (Virat Kohli) नाव देखील चर्चेत होतं. पण, फ्रँचायझीनं विराटच्या ऐवजी रजतला कॅप्टन केलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या सिझनपासून आरसीबीकडं आहे. त्यानं आरसीबीकडून सर्वात जास्त रन्स तसंच सर्वात जास्त सेंच्युरी केल्या आहेत. त्याचबरोबर तो 2011 ते 2021 ही दहा वर्ष आरसीबीचा कॅप्टन होता. आगामी आयपीएल सिझनपूर्वी त्याला तब्बल 21 कोटी रुपये देऊन आरसीबीनं त्याला रिटेन केलं आहे. तो आरसीबीचा सर्वात मोठा ब्रँड आहे. विजेतेपद पटकावण्यात कमनशिबी ठरुनही टीमला फॅन्सचं प्रेम मोठ्या प्रमाणात लाभलंय. त्यामागे विराट कोहलीची लोकप्रियता हा मोठा फॅक्टर आहे. 

या सर्व जमेच्या गोष्टीनंतर आरसीबीनं विराटला कॅप्टन न करण्याची काही महत्त्वाची कारणं आहेत.

पहिलं कारण

विराट कोहली स्वत: कॅप्टन होण्यास उत्सुक नव्हता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विराटनं स्वत:हून 2021 मध्ये आरसीबीची कॅप्टनसी सोडली होती. त्याला बॅटिंगव सर्व फोकस करायचा असून अधिक मुक्तपणे बॅटिंग करायची आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा कॅप्टनसीचं ओझं स्विकारण्यास तयार नव्हता.

दुसरं कारण

विराट आता 37 वर्षांचा आहे. साहजिकच आगामी काही सिझनचा विचार केला तर तरुण कॅप्टन करण्यावर फ्रँचायझीचा भर होता.  विराटचा खेळ देखील सध्या पूर्वीासारखा राहिलेला नाही. कॅप्टनसीचं ओझं देऊन त्याला अधिक प्रभावित करणे आरसीबीच्या हिताचे नव्हते.

( नक्की वाचा : विराट कोहलीच्या RCB ला अद्याप एकदाही आयपीएल चॅम्पियन का होता आलं नाही? )
 

तिसरं कारण

रजत पाटीदार गेल्या काही सिझनपासून आरसीबीचा महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. त्याला आगामी सिझनपूर्वी 11 कोटी रुपये मोजून आरसीबनं रिटेन केले होते. त्याचवेळी नवा कॅप्टन म्हणून विराट किंवा रजत यांचा विचार होणार हे स्पष्ट झाले होते. विराट स्वत: कॅप्टन होण्यास उत्सुक नसल्यानं रजत पाटीदारचा मार्ग मोकळा झाला.

चौथं कारण

आरसीबीकडं काही चांगले विदेशी खेळाडू देखील आहेत. पण, ही इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा आहे. त्यामुळे येथील परिस्थितीची माहिती असणारा भारतीय खेळाडू टीमचा कॅप्टन असावा असं टीम मॅनेजमेंटचं मत होतं. हा निकष पूर्ण करणारा रजत पाटीदार हा चांगला पर्याय आहे.

( नक्की वाचा :  RCB च्या महिला टीमपासून पुरुषांनी काय शिकलं पाहिजे? )
 

पाचवं कारण

रजत पाटीदारच्या कॅप्टनसीमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वांना प्रभावित केलं आहे. तो आक्रमक कॅप्टन म्हणून ओळखला जातो. तसंच कॅप्टनसीचा त्याच्या बॅटिंगवर परिणाम झालेला नाही. रजतनं 16 T20 मध्ये टीमची कॅप्टनसी केली होती. त्यापैकी 12 मॅचमध्ये त्याची टीम जिंकली असून विजयाची सरासरी 75 टक्के आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये आरसीबीचा विजेतेपदाचा दुष्काळ संपेल अशी आशा फ्रँचायझीला आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: