दक्षिण पूर्व दिल्लीच्या जंगपुरा भागात एका वृद्ध डॉक्टरची हत्या करण्यापूर्वी मारेकऱ्यांनी त्यांना अत्यंत वाईट पद्धतीने टॉर्चर केल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांची हत्या करण्यापूर्वी पट्ट्याने त्यांचा गळा दाबण्यात आला आणि डोक्यावर एका वस्तूने हल्ला करण्यात आला होता. डॉक्टर योगेश चंद्र पॉल (63) शुक्रवारी जंगपुरा एक्सटेंशन स्थित आपल्या घरात मृत आढळले होते आणि त्यांचे हात बांधले होते. पोलिसांना पॉल यांच्या घराजवळील एक सीसीटीव्ही फुटेज तपासले, यात चार संशयास्पद व्यक्ती दिसले. एका पोलीस अधिकाऱ्यानी सांगितलं की, एक व्यक्ती बाहेर उभी होती, तर उरलेले तिघेजण घरात होते. त्यांनी पॉलला मारहाण केली, त्यांचं तोंड बंद केलं आणि त्यांना खुर्चाने बांधलं.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपी पॉलला खुर्चीला बांधून स्वयंपाकघरात घेऊन गेले. येथे त्यांनी पॉल यांच्या डोक्यावर एका जड वस्तूने हल्ला केला आणि कुत्र्याच्या पट्ट्याने गळा आवळला. आरोपींनी पॉल यांच्या कुत्र्याला बाथरूममध्ये बंद केलं होतं आणि तेथून पळून जाण्यापूर्वी घरात तोडफोडही केली.
नक्की वाचा - भर चौकात बंदूक घेऊन फिरत होता, सराईत गुन्हेगारला पोलिसांनी 3 मिनिटांत घडवली अद्दल
हत्येवेळी डॉक्टर पत्नी ड्यूटीवर...
पोलिसांनी हत्या आणि दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे आणि विविध पैलूंचा तपास करीत आहे. पॉल पत्नी नीना पॉलसह तेथे राहत होता. नीना दिल्लीतील एका सरकारी रुग्णालयात डॉक्टर आहेत. पतीची घरात हत्या झाली, त्यावेळी नीना रुग्णालयात होत्या. त्यांची एक मुलगी कॅनडा तर दुसरी मुलगी नोएडामध्ये राहते. दोघीही विवाहीत आहेत.
दिल्लीत वृद्ध असुरक्षित...
यापूर्वीही वृद्धांवर हल्ला आणि लुटीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सर्वसाधारणपणे लुटीसाठी आरोपी एकटे असलेल्या वृद्धांवर हल्ला करतात. सध्या मुलं नोकरीसाठी परदेशात जातात आणि आई-वडिलांना एकटं राहावं लागतं. हल्लेखोरांनी पॉल यांची हत्या केली, मात्र ते महागडा फोन आणि लॅपटॉप घेऊन गेले नाही. ही चूक त्यांना महागात पडू शकते हे त्यांच्या लक्षात आलं. लॅपटॉप आणि मोबाइलच्या मदतीने पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली असती.
पॉल यांचा पाळीव कुत्रा मौली मारेकऱ्यांना ओळखू शकेल अशी अपेक्षा पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. तो खूप रडत होता. या हत्याकांडात कोणी जवळील व्यक्तीचा हात असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. त्याने कुत्र्यावर नियंत्रण आणून त्याला बाथरूममध्ये बंद केलं असू शकतं. मारेकऱ्यांनी डॉक्टरांच्या घरातून कोणकोणत्या गोष्टींची चोरी केली, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.