जाहिरात

Dombivli News: 15 दिवसांपूर्वी होणाऱ्या पतीचा अपघात झाला, डोंबिवलीच्या तरुणीला जबर धक्का, घरातच स्वत:ला संपवलं

डोंबिवली पूर्व येथील सोनारपाडा परिसरात 18 वर्षीय तरुणीच्या मृत्यूची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Dombivli News: 15 दिवसांपूर्वी होणाऱ्या पतीचा अपघात झाला, डोंबिवलीच्या तरुणीला जबर धक्का, घरातच स्वत:ला संपवलं
Dombivli Khushi Naik Suicide News

Khushi Naik Suicide Case : डोंबिवली पूर्व येथील सोनारपाडा परिसरात 18 वर्षीय तरुणीच्या मृत्यूची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. पंधरा दिवसांपूर्वी होणाऱ्या पतीचा कार अपघातात मृत्यू झाला होता. त्याचा धसका घेतल्याने या तरुणीने आत्महत्या केली,अशी माहिती समोर आली आहे.खुशी नाईक असं जीवन संपवलेल्या तरुणीचं नाव आहे.

खुशीचा मिथुनसोबत साखरपुडा झाला अन्..

खुशी  सोनारपाडा येथील यशवंत ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये राहायची.खुशीचा राहत्या घरी मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात पाठवण्यात आला. प्राथमिक तपासातील माहितीनुसार,खुशीचा मिथुन नावाच्या तरुणासोबत साखरपुडा झाला होता आणि काही दिवसात त्यांचा विवाह होणार होता.

नक्की वाचा >> Pune News: कोणामुळे घडली मोशी कचरा डेपो दुर्घटना? 'त्या' दोन बड्या अधिकाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन

तरुणी होती मानसिक तणावात

मात्र,जवळपास पंधरा दिवसांपूर्वी कार अपघातात तिच्या होणाऱ्या पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेनंतर ती मानसिक तणावात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे,अशी माहिती खुशीच्या शेजाऱ्यांनी दिली आहे.या प्रकरणात मानपाडा पोलिसांकडून सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.मृत्यूमागचं नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

नक्की वाचा >> Buldhana News: बुलढाण्यात खळबळ! शेतात काम करणाऱ्या महिलेसोबत घडला संतापजनक प्रकार, पीडितेची पोलिसांत धाव

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com