जाहिरात

Buldhana News: बुलढाण्यात खळबळ! शेतात काम करणाऱ्या महिलेसोबत घडला संतापजनक प्रकार, पीडितेची पोलिसांत धाव

महिलेने स्पष्ट नकार दिल्यानंतरही आरोपी पुन्हा तिच्या दिशेनं आला आणि त्याने अश्लील भाषा वापरून तिच्याशी गैरवर्तन केलं.

Buldhana News: बुलढाण्यात खळबळ! शेतात काम करणाऱ्या महिलेसोबत घडला संतापजनक प्रकार, पीडितेची पोलिसांत धाव
Women Molested In The Farm

अमोल सराफ, प्रतिनिधी 

Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथे शेतात काम करणाऱ्या एका महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 75 व 78 अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गजानन पुंडा वसतकार असं आरोपीचं नाव आहे.

महिलेनं नकार देऊनही आरोपीनं गैरवर्तन केलं

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,13 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला आपल्या शेतात निंदणाचे काम करत होती.त्यावेळी आरोपी तेथे आला आणि तिला वारंवार गाडीवर येण्याचा आग्रह करू लागला. महिलेने स्पष्ट नकार दिल्यानंतरही आरोपी पुन्हा तिच्या दिशेनं आला आणि त्याने अश्लील भाषा वापरून तिच्याशी गैरवर्तन केलं, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

नक्की वाचा >>Pune News: कोणामुळे घडली मोशी कचरा डेपो दुर्घटना? 'त्या' दोन बड्या अधिकाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन

पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू

महिलेच्या तक्रारीनुसार जळगाव जामोद पोलीस ठाण्यात आसलगाव येथील गजानन पुंडा वसतकार ह्या आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 75 व 78 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com