Dombivli News : 'तुम्ही घर सोडा, नाहीतर सोडणार नाही'; डोंबिवलीत 90 वर्षांच्या आजीबाईंना भूमाफियांची धमकी

Dombivli News : डोंबिवलीतील कल्याण-शीळ रस्त्यालगत असलेल्या टाटा नाक्याजवळील संतनगर आदिवासी पाडा येथे हा प्रकार घडत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dombivli News : या प्रकरणामुळे कल्याण-डोंबिवली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
डोंबिवली:

Dombivli News : डोंबिवलीमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येखील आदिवासी बांधवांच्या जमिनी आणि घरांवर एका व्यक्तीने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. याबाबत भारतीय जनता पार्टीच्या  (भाजपा) पदाधिकारी मनीषा राणे यांनी गंभीर आरोप केले असून, आदिवासी नागरिकांवर होणारा अन्याय भाजपा कदापि सहन करणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे कल्याण-डोंबिवली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

डोंबिवलीतील कल्याण-शीळ रस्त्यालगत असलेल्या टाटा नाक्याजवळील संतनगर आदिवासी पाडा येथे हा प्रकार घडत आहे. या पाड्यामध्ये आदिवासी नागरिक गेल्या 90 वर्षांपासून वास्तव्यास आहेत आणि याच ठिकाणी त्यांची घरे आहेत. मात्र, एका व्यक्तीची या जागांवर वाईट नजर असून, तो आदिवासी नागरिकांची जमीन हडप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाच्या पदाधिकारी मनीषा राणे यांनी केला आहे. मनीषा राणे यांनी तत्काळ परिसराला भेट देऊन तेथील आदिवासी बांधवांशी चर्चा केली आणि त्यांची बाजू समजून घेतली.

( नक्की वाचा : Pune News : एक बाई आणि 12 भानगडी! ॲसिड हल्ला ते पुरुषांशी जबरदस्तीनं जवळीक, 'या' बाईची संपूर्ण पुण्यात चर्चा )

पीडित महिलांचा गंभीर आरोप 

या संदर्भात बोलताना वनिता नावाच्या एका आदिवासी महिलेने सांगितले की, त्यांच्या घरावर शेड टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. जेव्हा त्यांनी याला विरोध केला, तेव्हा समोरच्या व्यक्तीने "तुम्ही घर सोडून जा, नाहीतर तुम्हाला सोडणार नाही" अशी थेट धमकी दिली.

लडकुबाई नावाच्या एका वृद्ध महिलेने देखील अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिली. त्यांच्या तीन पिढ्या या जागेवर राहत आहेत, तरीही एक व्यक्ती त्यांची जागा हडप करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. या जमिनीचा सातबारा आदिवासींच्या नावावर असल्याचे मनीषा राणे यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Akola News : अकोल्यात 13 वर्षांच्या मुलीनं संपवलं आयुष्य, शाळेतील 'त्या' प्रकरणामुळे उचललं टोकाचं पाऊल! )

भाजपाचा कडक इशारा 

मनीषा राणे यांनी आदिवासी नागरिकांशी चर्चा केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती मानपाडा पोलिसांना दिली आहे. त्यांनी ठामपणे सांगितले की, "आदिवासींची जागा लाटण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. त्यांच्यावर कोणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला, तर तो भाजपा सहन करणार नाही. भाजपा आदिवासी बांधवांच्या सोबत खंबीरपणे उभी राहील, असंही स्पष्ट केलं"


या गंभीर आरोपांनंतर आता मानपाडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. आदिवासींच्या जागा लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर पोलीस कोणती कारवाई करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन काय पाऊले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article