
Dombivli News: डोंबिवलीच्या अल्पवयीन मुलीवर एक्स्प्रेस मेलच्या बाथरुममध्ये बलात्कार करणाऱ्या नराधमाला अखेर अटक करण्यात आली आहे. गजानन चव्हाण असं या नराधमाचं नाव आहे. त्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अकोलामध्ये अटक केलीय. या अल्पवयीन मुलीवर डोंबिवलीत आणखी एका तरुणानं बलात्कार केला होता. त्या प्रकरणाचा तपास डोंबिवली पोलीस करत आहेत.
काय आहे प्रकरण?
गजानन चव्हाण हा नराधम मुळचा अकोल्याचा आहे. तो कल्याणमध्ये यापूर्वी राहात होता. तो अकोल्याहून पुन्हा कामाच्या शोधात कल्याणला आला होता. त्याची कल्याण रेल्वे स्टेशनवर एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. त्यानं त्या मुलीशी मैत्री केली. तिला फूस लावून अकोल्याला जाऊ असं सांगितलं. त्यानंतर ते दोघेही अकोल्याला जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये चढले.
( नक्की वाचा: Drug Racket: KDMC ड्रग्ज तस्कारांचा नवा अड्डा! डोंबिवलीतील आणखी एका घरात सापडला 2 कोटींचा साठा )
या प्रवासाच्या दरम्यान आरोपी तरुणानं पीडितेला एक्स्प्रेसमधील बाथरुममध्ये नेले. त्यानं कसारा ते अकोला रेल्वे स्टेशनच्या दरम्यान मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तो तिला घरी घेऊन गेला. त्यानं घरच्यांना पीडित मुलगी माझी मैत्रिण असल्याचं सांगितलं.
त्यानंतर, आरोपीच्या आई-वडिलांनी मुलीला कल्याणला घरी सोडून ये असे सांगितले. त्यावेळी आरोपी पीडितेला घेऊन पुन्हा अकोला रेल्वे स्टेशनवर आला. त्याने अकोला रेल्वे स्टेशनवर पीडित मुलीला सोडून दिलं. त्यानंतर तो फरार झाला. पीडित मुलीनं सर्व प्रकाराची माहिती अकोला रेल्वे पोलिसांना दिली. या गुन्ह्याची सुरुवात कल्याणमध्ये झाली होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास कल्याण रेल्वे पोलिसांना देण्यात आला होता.
( नक्की वाचा : Dombivli: कल्याण स्टेशनवर भेटला तरुण, अकोल्यात नेलं, डोंबिवलीच्या अल्पवयीन मुलीबाबत भयंकर घडलं! )
पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या टीमनं या प्रकरणाचा तपास केला. त्यांच्या तपासाला अखेर यश आलं. त्यांनी आरोपी गजानन चव्हाणला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
दरम्यान पीडित मुलीनं आपल्यावर वर्षभरापूर्वी डोंबिवलीत बलात्कार झाल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत दिली होती. त्या प्रकरणातील आरोपीचा सध्या डोंबिवली पोलीस तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world