Dombivli: डोंबिवलीतल्या अल्पवयीन मुलीवर एकाच वर्षात दोन वेळा दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यामधील एक प्रकरण नुकतेच घडले असून एक साधारण वर्षभरापूर्वीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवलीच्या या अल्पवयीन तरुणीला कल्याणच्या स्टेशनवर एक तरुण भेटला. त्याने या मुलीशी मैत्री केली. त्यानंतर तो तिला अकोल्यात गेऊन गेला. या कालावधीमध्ये तिने या तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर तो तिला अकोला रेल्वे स्टेशनवर सोडून फरार झाला.
( नक्की वाचा: आई-वडिलांना चांगलं आयुष्य देण्यासाठी परदेशात गेली निमिषा, 16 जुलै रोजी होणार फाशी! )
पीडित मुलगी अकोला रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोलिसांन सापडली. त्यांनी केलेल्या चौकशीमध्ये या धक्कादायक प्रकारची माहिती उघड झाली. त्याचबरोबर आपल्यावर साधारण वर्षभरापूर्वी आणखी एका तरुणानं बलात्कार केल्याची जबानी या तरुणींनी पोलिसांना दिली.
पीडित तरुणीनं दिलेल्या माहितीनुसार ती डोंबिवलीतील एका सुखवस्तू कुटुंबातील आहे. साधारण वर्षभरापूर्वी एका तरुणानं आपल्यावर बलात्कार केला, असल्याचं तिनं सांगितलं. पीडित मुलीनं दिलेल्या माहितीनंतर अकोला रेल्वे पोलिसांनी एक प्रकरण कल्याण रेल्वे पोलिसांकडे सोपवले. तर वर्षभरापूर्वी झालेल्या बलात्कार प्रकरणाचा तपास डोंबिवली पोलीस करत आहेत.