जाहिरात

ओळख पटवणं होतं अशक्य, पण डोंबिवली पोलिसांनी करून दाखवलं! 3 वर्ष शेतात लपलेल्या खुन्याचा असा लागाला छडा

Dombivli News: डोंबिवलीतील एका खळबळजनक हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात विष्णूनगर पोलिसांना तब्बल 3 वर्षांनंतर यश आले आहे.

ओळख पटवणं होतं अशक्य, पण डोंबिवली पोलिसांनी करून दाखवलं! 3 वर्ष शेतात लपलेल्या खुन्याचा असा लागाला छडा
Dombivli News: आरोपीनं स्वतःची ओळख लपवण्यासाठी अत्यंत सावधगिरी बाळगली होती.

Dombivli News: डोंबिवलीतील एका खळबळजनक हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात विष्णूनगर पोलिसांना तब्बल 3 वर्षांनंतर यश आले आहे. दारू पार्टी दरम्यान झालेल्या वादातून रिक्षाचालक मित्राची हत्या करून फरार झालेला मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. विशेष म्हणजे, या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांनी नांदेडमध्ये 5 दिवस शेतमजुराचा वेष धारण केला होता.

काय आहे प्रकरण?

डोंबिवली येथील देवीचा पाडा खाडी किनारी सोमनाथ शिंदे या रिक्षाचालकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. एका दारू पार्टी दरम्यान झालेल्या वादातून ही घटना घडली होती. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी यापूर्वीच विलन ठावरे आणि योगेश डोंगरे या दोघांना अटक केली होती. मात्र, या संपूर्ण हत्येचा मुख्य सूत्रधार मानला जाणारा दीपक करकडे हा घटनेनंतर लगेच फरार झाला होता.

( नक्की वाचा : Mumbai Underworld : मुंबईत अंडरवर्ल्डचा थरार, दया नायक यांच्या खबऱ्याचा 27 वर्षांनी 'गेम', पुतण्यानं घेतला बदला )

ओळख लपवण्यासाठी आधुनिक जगाशी तोडला संपर्क

दीपक करकडे हा गेल्या 3 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याने स्वतःची ओळख लपवण्यासाठी अत्यंत सावधगिरी बाळगली होती. त्याने स्वतःकडे कोणतेही ओळखपत्र जसे की पॅनकार्ड ठेवले नव्हते. इतकेच नाही तर पोलिसांना ट्रॅक करता येऊ नये म्हणून तो कधीही मोबाईलचा वापर करत नव्हता. तो नांदेडमध्ये एका शेतात मजूर म्हणून काम करत होता, जेणेकरून कोणालाही त्याच्यावर संशय येणार नाही.

शेतमजुराच्या वेषात पोलिसांची गस्त

कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे, विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे आणि पोलीस निरीक्षक जी. गमे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला शोधण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. आरोपीचा कोणताही तांत्रिक सुगावा उपलब्ध नसताना पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार नांदेड गाठले. आरोपी ज्या भागात लपला होता, तिथे पोलिसांनी सलग 5 दिवस शेतमजुराचा वेष धारण करून वास्तव्य केले.

( नक्की वाचा : Kalyan News:लग्नाच्या 2 दिवस आधी काका-पुतण्यात तुंबळ हाणामारी; कल्याणच्या घटनेला नवं वळण, पोलिसही चक्रावले! )

अखेर 3 वर्षांनंतर लागला छडा

शेतमजूर म्हणून वावरताना पोलिसांनी दीपकची ओळख पटवली आणि योग्य संधी मिळताच त्याला बेड्या ठोकल्या. कोणत्याही डिजिटल पुराव्याशिवाय केवळ पारंपरिक तपास पद्धती आणि जिद्दीच्या जोरावर पोलिसांनी ही कारवाई पूर्ण केली. 3 वर्षांपासून बेपत्ता असलेला हा गुन्हेगार आता पोलिसांच्या कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com