जाहिरात

Dombivli News : डोंबिवलीकरांच्या जीवाला घोर; पूर्वेकडील स्कायवॉकवरुन जाताना तरुण भेदरला, दिवसाढवळ्या काय घडलं?

दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. 

Dombivli News : डोंबिवलीकरांच्या जीवाला घोर; पूर्वेकडील स्कायवॉकवरुन जाताना तरुण भेदरला, दिवसाढवळ्या काय घडलं?

Dombivli News : डोंबिवलीतील एका घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. डोंबिवली पूर्वेतील स्कायवॉकवर एका व्यक्तीची दिवसाढवळ्या लूट करण्यात आली आहे. दररोज मोठ्या संख्येने नागरिक या स्कायवॉकवरुन जात असतात. दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. 

डोंबिवली पूर्वेतील स्कायवॉकवर एका व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत लूट केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रारदार गौरव गाला हे श्रीखंडेवाडी परिसरात राहणातात. ते व्यवसायाने व्यापारी आहेत. मानपाडा रोडवरील पांडुरंगवाडी येथे त्यांचा कॉस्मेटिकचा व्यवसाय आहे. गौरव गाला व्यावसायिक कामानिमित्त मुलुंड येथे गेले होते. काम संपवून ते लोकलने डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरून स्कायवॉकवरून पूर्वेकडील इंदिरा चौकाकडे जात असताना ही घटना घडली.

नक्की वाचा - Kalyan News : बापाने अडीच वर्षांच्या चिमुरडीचा गळा चिरला, रुग्णालयाकडून दुर्लक्ष; पीडित आईचं आक्रंदन

स्कायवॉकवर नेमकं काय घडलं?  

डोंबिवली पूर्वेकडील स्कायवॉकवर समोरून आलेल्या एका इसमाने गाला यांना मुद्दाम जोराचा धक्का दिला आणि “धक्का का मारला?” असा वाद सुरू केला. क्षणातच त्या भामट्याने खिशातून चाकू काढून गौरव गाला यांना धमकावले. “जास्त गडबड केली तर इथून जाऊ देणार नाही, माझी माणसं आसपास आहेत,” अशी धमकी देत त्याने गालांच्या खिशात हात घालून जबरदस्तीने १० हजार रुपये काढून घेतले. लुटीनंतर आरोपी रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघून गेला. गाला यांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पुन्हा धमकी देत “जास्त केलंस तर पुलाखाली फेकून देईन,” असं म्हणत पळ काढला. या घटनेनंतर घाबरलेल्या गाला यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com