Mumbai News: मुंबई विमानतळावर भाजप पदाधिकाऱ्याला अटक, रवींद्र चव्हाण यांच्यासोबतचा 'तो' फोटोही आला समोर

भाजप पदाधिकाऱ्याला मुंबई विमानतळावर अटक केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबई विमानतळावर सोने तस्करी प्रकरणात महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) ने मोठी कारवाई केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
BJP leader Ajit Achrekar Arrested

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी 

Mumbai Crime News Today : भाजप पदाधिकाऱ्याला मुंबई विमानतळावर अटक केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबई विमानतळावर सोने तस्करी प्रकरणात महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) ने मोठी कारवाई केली आहे. 5 कोटींहून अधिक किमतीचे सोने व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  अजित आचरेकर असं अटक केलेल्या भाजप पदाधिकाऱ्याचं नाव असून इतर 5 जणांनाही अटक करण्यात आलीय. 

पहाटेच्या वेळी डीआरआयने केली मोठी कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, आचरेकर भाजप कामगार संघटनेचा चिटणीस असल्याची माहिती आहे.काही महिन्यांपूर्वी भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना पक्षाकडून कामगार संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली,असा दावा केला जात आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Ambernath News: अंबरनाथ अलर्ट मोडवर, भगतसिंग नगर परिसरात खळबळजनक घटना, आरोपी शरीफ शेखला अटक

सोने तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट?

काल शनिवारी पहाटे 2.30 वाजताच्या सुमारास डीआरआयने ही कारवाई केली आहे.जप्त केलेल्या सोन्याची किंमत 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. हे 
सोने तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का? याचा तपास केला जात आहे.या प्रकरणात आणखी कोणत्या व्यक्तीचा किंवा प्रभावशाली घटकांचा सहभाग आहे का?याचीही चौकशी केली जात आहे.