Kalyan News: कल्याणमध्ये ‘दृश्यम’ सिनेस्टाईल मर्डर; प्रेयसी कोलकात्याला फरार, बाथरूमध्ये मिळाला हत्येचा क्लू

कल्याणच्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलंग रोड परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan Murder Case Latest News

Kalyan Murder Case Latest News :  कल्याणच्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलंग रोड परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.घर मालकाच्या माहितीनुसार,गेल्या अडीच महिन्या पासून फ्लॅट क्रमांक 104 मधून पाणी बाहेर पॅसेजमध्ये वाहत असल्याची तक्रार इमारतीतील रहिवाशांनी घरमालक अजय पाटील यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी भाडेकरूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने संशय अधिक बळावला. दरम्यान, घरमालकाला आरोपी महिलेचा एक व्हॉईस मेसेज प्राप्त झाला. या मेसेजमध्ये प्रियकराचा खून केल्याचे सांगत मृतदेह बाथरूममध्ये असल्याची माहिती देण्यात आल्याचा दावा करण्यात आला.

रक्ताचे डाग आणि इतर पुरावे नष्ट करण्यासाठी केलं असं काही..

हा मेसेज मिळताच घरमालकाने तातडीने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी फ्लॅटची पाहणी केली असता बाथरूममध्ये गोणीत बांधलेला मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात मृताच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच रक्ताचे डाग आणि इतर पुरावे नष्ट करण्यासाठी बाथरूमचा नळ सुरू ठेवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Pune News : मेव्हण्यावर जीवघेणा हल्ला, पुण्यात घडली लव्ह अफेअरची खतरनाक घटना, CCTV व्हायरल झाल्याने खळबळ

हत्येमागचं नेमकं कारण काय?

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. हत्येनंतर आरोपी महिला कोलकात्याला गेल्याची माहिती तपासात समोर आली असून तिचा शोध घेण्यासाठी तीन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मानपाडा पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. प्रेमसंबंध, वैयक्तिक वाद की अन्य कोणते कारण याचा शोध पोलीस घेत असून या थरारक हत्याकांडामुळे कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.