Drugs Smuggling : सध्या देशभरात ड्रग्सचं जाळ पसरत आहे. देशातून...राज्यांमधून ड्रग्सची तस्करी केली जात असल्याच्या बातम्या चिंता वाढवणाऱ्या आहेत. ड्रग्सची तस्करी विविध प्रकारे केली जाते. हवाई मार्गाने तर कधी समुद्र वाहतुकीतून ड्रग्स देशात आणले जातात. दरम्यान पंजाबमधून ड्रग्स तस्करीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंजाबमध्ये पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून ड्रग्सची तस्करी केली जात होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमृतसरमध्ये पोलिसांनी 8 किलो हेरॉइन आणि एक पिस्तुलीसह तस्करीला अटक केली आहे. त्याच्याजवळ पाच जिवंत काडतूसंदेखील आढळले आहेत. गुप्त सूचनेच्या आधारावर नाकाबंदी दरम्यान तस्कराला अटक करण्यात आली. याचं नाव धरमिंदर सिंग आहे. हा तस्कर पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून ड्रग्स मागवित होता. आरोपीच्या चौकशीदरम्यान हा प्रकार उघड झाला.
अमृतसरचे पोलीस आयुक्त गुरप्रीत भुल्लरने सांगितलं की, आरोपी हर्षा छिना गावचा आहे. अजनाला सेक्टरमधून तो तस्करी करीत होता. आरोपी धरमिंदर सिंग हा मोठा तस्कर आहे, हा पकडल्यामुळे ड्रग्सचं मोठं जाळं उघड होईल. सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे. याआधी त्याने किती वेळा हेरोइन मागवले, आतापर्यंत कोणाविरोधात केस का दाखल करण्यात आली नाही याचाही शोध घेतला जात आहे.