Mexican president Claudia Sheinbaum Latest News : मेक्सिकोच्या राष्ट्रपती क्लाउडिया शीनबाम यांच्यासोबत रस्त्यावरच छेडछाड झाल्याची संतापजनक घटना घडलीय. या प्रकरणामुळे त्यांनी बुधवारी लैंगिक शोषणाच्या गुन्हे गंभीर प्रकार असल्याची घोषणा केलीय. त्यांच्यावर अशाप्रकारचा हल्ला झाल्यानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याआधीही 63 वर्षीय शीनबान यांच्यावर हल्ला झाला होता. जेव्हा त्या मंगळवारी मेक्सिको शहरात राष्ट्रपती भवनजवळ समर्थकांचं अभिवादन स्वीकारत होत्या.
मद्यपान केलेला व्यक्ती राष्ट्रपतींच्या जवळ आला अन् नको ते केलं
मिळालेल्या माहितीनुसार, क्लाउडिया एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी रवाना झाल्या होत्या. तेव्हा अचानक मद्यपान केलेला एक व्यक्ती त्यांच्याजवळ आला. त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि दुसऱ्या हाताने त्यांच्या छातीला स्पर्श केला. तसच त्यांच्या मानेला किस करण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान, राष्ट्रपती सुरक्षा विभागातील एका सदस्याने त्या व्यक्तीला लगेच खेचलं. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आणि त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. आता देशभरात महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा प्रकरणांमध्ये मेक्सिकोमधील रेकॉर्डही चिंताजनक आहेत.
नक्की वाचा >>30 वेळा रेप, 7 पुरुषांचा खून केला..जगातील सर्वात खतरनाक 'Serial Killer' ची स्टोरी OTT वर झळकणार, कुठे पाहाल?
मेक्सिकोमध्ये दररोज होते सरारसी 10 महिलांची हत्या..कारण काय?
संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, 15 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या 70 टक्के मेक्सिकन महिलांना त्यांच्या जीवनात कमीत कमी एक वेळा लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो. संयुक्त राष्ट्रांचं म्हणणं आहे की, मेक्सिकोमध्ये प्रत्येक दिवशी सरासरी 10 महिलांची हत्या होते. ही घटना घडल्यानंतर शीनबामने बुधवारी म्हटलंय की,सरकार लैंगिक शोषणाच्या संबंधीत राष्ट्रव्यापी कायद्याची लवकरात लवकर अमंलबजावणी करेल.
एका पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलं की, जर मी तक्रार दाखल केली नाही, तर इतर मेक्सिकन महिलांचं काय होईल? जर राष्ट्रपतीसोबत असं घडलं, तर आमच्या देशातील सर्व महिलांचं काय होणार? हा एक गंभीर गुन्हा आहे आणि यासाठी आम्ही चळवळ सुरु करणार आहोत.