Indian Railway Diamond Point : भारतीय रेल्वेला देशाची लाईफलाईन असं म्हटलं जातं. कारण प्रत्येक दिवशी लाखो लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या लोकेशनवर जातात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, जर चार दिशांनी ट्रेन एकाच जागेवर येत असेल, तर काय होईल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण महाराष्ट्राच्या नागपूर रेल्वे स्टेशनवर असं रोज होतं. तरीही कोणत्याच दिवशी अपघात होत नाही.
डायमंड क्रॉसिंग का म्हटलं जातं?
नागपूर रेल्वे स्टेशन भारतातील सर्वात व्यस्त जंक्शनपैकी एक आहे. इथे देशातील चार मुख्य रेल्वे मार्ग उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अशा दिशांनी ऐकमेकांना क्रॉस करतात. वरच्या बाजूंनी पाहिलं तर, रेल्वे पटरी हीरे (Daimond) च्या आकारासारखी दिसते. या सुंदर पॅटर्नमुळे याला डायमंड क्रॉसिंग म्हटलं जातं. ही भारतातील एकमात्र रेल्वे पॉईंट आहे, जिथे चारही दिशांनी ट्रेन एकाच जागेवरून धावते.
या डायमंड क्रॉसिंगवरून कोणकोणत्या ट्रेन धावतात?
मुंबई-हावडा, दिल्ली-चेन्नई, काजीपेट-नागपूर आणि नागपूर-इटारसी, या मार्गांवर राजधानी एक्स्प्रेस, दुरांतो, गरीब रथ, मेल आणि सुपरफास्ट ट्रेन रोज धावतात. म्हणजे प्रत्येक दिवशी हजारो ट्रेन या डायमंड पॉईंटहून बाहेर जातात. तरीही सर्वकाही खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रीत राहतं.

नक्की वाचा >> Raiilway Station: 'छत्रपती संभाजीनगर' बोर्डाखाली लघुशंका केली, तरुणाने जीव गमावला! शिवसेना नेत्यानं काय केलं?
ट्रेनची टक्कर का होत नाही? या स्मार्ट सिस्टमचं सीक्रेट काय आहे?
आता असा प्रश्न उपस्थित होतो की, जेव्हा चारही दिशांनी ट्रेन धावते, तर या ट्रेनची टक्कर का होत नाही? इंटरलॉकिंग सिस्टम आणि ऑटोमॅटिक सिग्नलिंग टेक्नोलॉजी असं याचं उत्तर आहे. हे सिस्टम एका वेळी फक्त एक ट्रेनलाच क्रॉसिंग करू देतं. त्या ठिकाणाहून एक ट्रेन जशी रवाना होते, पुढच्या ट्रेनसाठी सिग्नल आपोआप अॅक्टिव्ह राहतं. यामुळे ट्रेन्सचा प्रवास पूर्णपणे नियंत्रणात राहतो आणि अपघाताची शक्यताही कमीच असते.नागपूरचं डायमंड क्रॉसिंग भारतीय रेल्वेतील तांत्रिक नियंत्रण आणि अभियांत्रिकी कामकाजाचं जबरदस्त बॅलेन्स ठेवतं. इथे प्रत्येक वेळी ट्रेनच्या मुव्हमेंटवर नजर ठेवली जाते.
नक्की वाचा >> Women Health Issues : आई होण्यापासून ते मेनोपॉजपर्यंत..शरीरात कोणकोणते बदल होतात? प्रत्येक महिलेला माहितच हवं
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world