जाहिरात

Eknath Khadse : खडसेंचे जावई दर आठवड्याला पार्टी करत होते, पोलीस तपासाचा वाचा Exclusive Report

Pune Rave Party : पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे

Eknath Khadse : खडसेंचे जावई दर आठवड्याला पार्टी करत होते, पोलीस तपासाचा वाचा Exclusive Report
पुणे:

Pune Rave Party : पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईमध्ये खडसेंचा जावईच सापडल्यानं जोरदार खळबळ उडाली होती. या प्रकरणात राजकारण असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय. तर त्याचवेळी पोलिसांच्या तपासासाची एक्स्क्लुझिव्ह माहिती 'NDTV मराठी' च्या हाती आली आहे. 

दर आठवड्याला पार्टी

पुणे पोलिसांनी अटकेत असलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांचे तीन वर्षांमधले रेकॉर्ड तपासले आहेत. त्यामध्ये खेवलकर दर आठवड्याला पार्टी करत असल्याचं आढळलं आहे. कल्याणी नगरमधील एका बारमध्ये 60 हजारांचे बील त्यांनी केले होते, अशी माहितीही या रिपोर्टमध्ये आहे.

प्रांजलनं आपण कधीही ड्रग्ज घेतले नसल्याचं पोलिसांना सांगितलं. ते काही गाण्याचे अल्बम करत होते. या प्रकरणातील इतर आरोपींनी ड्रग्ज घेण्यासाठी व्हॉट्सअप चॅट केल्याचं पोलिसांना आढळून आलं. पोलिसांना रेव्ह पार्टी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. 

( नक्की वाचा : Eknath Khadse: '7 जण एका खोलीत बसले म्हणजे...' जावयाच्या अटकेनंतर खडसेंनी विचारला रेव्ह पार्टीवर प्रश्न )

या कारवाईमध्ये पोलिसांनी सुरुवातीला प्रांजलला ओळखलेही नव्हते. या कारवाईत सापडलेल्या मुलीही मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. यामधील एकाच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याची माहिती आहे. आता पोलिसांना दुसऱ्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. 

 खडसेंचा आरोप

दरम्यान माझ्यावरही पाळत ठेवली जात आहे. माझ्या घराजवळ सहा ते सात साध्या वेशातील पोलीस पाळत ठेवत आहेत, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. खडसे यांनी पुण्यातील पत्रकारल परिषदेमध्ये हा आरोप केला.  माझ्यावर पाळत ठेवण्याचं कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खडसेंच्या घराबाहेर पाच ते सहा पोलीस साध्या वेशात आढळून आले होते. याचा व्हिडिओ रोहिणी खडसे यांनी शूट केला आहे. त्यानंतर खडसेंनी पत्रकार परिषदेत हा व्हिडिओही दाखविला. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com