जाहिरात

Elon Musk : मेट्रोमध्ये महिलेला पेटवलं, आरोपी शांतपणे पाहत राहिला..., एलन मस्क म्हणाले, WOW!

एलन मस्क यांनी अमेरिका नावाच्या हँडलवरुन केलेलं ट्विट रिट्विट केलं आहे. यावर लिहिलंय...Wow. 

Elon Musk : मेट्रोमध्ये महिलेला पेटवलं, आरोपी शांतपणे पाहत राहिला..., एलन मस्क म्हणाले, WOW!

न्यूयॉर्कमध्ये एका महिलेला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनिर्वासित व्यक्तीने केलेल्या या कृत्यानंतर पुन्हा एकदा अमेरिकन नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेवर उद्योगपती एलन मस्क यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एलन मस्क यांनी अमेरिका नावाच्या हँडलवरुन केलेलं ट्विट रिट्विट केलं आहे. यावर लिहिलंय...Wow. 

न्यूयॉर्कमध्ये नेमकं काय घडलं?
न्यूयॉर्कमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. माणूस किती क्रूर होऊ शकतो. याचं उदाहरण समोर आलं आहे. उदबत्तीचाही छोटा चटका लागला तरी आपल्याला कळवळायला होतं. येथे मात्र एका महिलेला जिवंत जाळलं. तिची किती तडफड झाली असेल याचा विचारही करता येऊ शकत नाही. ही घटना घडली आहे न्यूयॉर्क शहरातल्या मेट्रोमध्ये. ही महिला सकाळी साडेसात वाजता मेट्रोमधून ब्रुकलिनकडे जात होती. स्टिलवेल एव्हेन्यू स्टेशनमध्ये मेट्रो बसलेली असताना एका व्यक्तीने महिलेच्या कपड्यांना लायटरने आग लावली. आग हळूहळू महिलेच्या सगळ्या शरीराला लागली. ती मदतीसाठी विव्हळत राहिली, मात्र कुणीही मदतीला गेलं नाही. 

14 वर्षांच्या मुलाच्या पेंटिंगमुळे सीरियात 50 वर्षांच्या सत्तेला सुरुंग, 13 वर्षात नेमकं काय घडलं?

नक्की वाचा - 14 वर्षांच्या मुलाच्या पेंटिंगमुळे सीरियात 50 वर्षांच्या सत्तेला सुरुंग, 13 वर्षात नेमकं काय घडलं?

उलट आग लावणारा आरोपी त्याच मेट्रो स्टेशनवर शांतपणे तिला जळताना पाहत होता. उलट आग विझायला लागल्याचं पाहून तो जागेवरून उठला आणि त्याने पुन्हा हातातील कापडाने हवा देण्यास सुरूवात केली. जणू काही तिच्या शरीराचा प्रत्येक अवयव या आगीत जळून खाक व्हावा याची तो वाट पाहत होता. हे दृष्य इतकं बिभत्स होतं की, कुणाचीही तिथे थांबण्याची इच्छा झाली नाही. ना कोणी मदतीसाठी धावून आलं. मेट्रोमधून निघणारा धूर पाहुन पोलिसांनी तिथे धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

तिला वाचवण्याचा कोणताही मार्ग शिल्लक राहिला नव्हता. न्यूयॉर्क पोलिसांनी CCTV च्या आधारे दुसऱ्या मेट्रोमधूनच प्रवास करत असताना आरोपीला पकडलं. हा आरोपी अमेरिकेत अनिर्वासीत म्हणून दाखल झाला होता. तो मूळचा ग्वाटेमालाचा रहिवासी आहे. या घटनेनंतर अमेरिकन नागरिकांच्या मनात पुन्हा एकदा निर्वासितांविषयीचा राग उफाळून आला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते या घटनेवेळी महिला गाढ झोपेत होती. दोघांचा काही संवादही झाला नव्हता. त्यामुळे ती महिला कोण होती, तिची अशी हत्या का केली असे अनेक प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com