जाहिरात

पुण्याची ती मुस्लीम तरुणी आणि आणि इंजिनिअर भावाचा क्रूर अवतार; बहिणीचा काटा काढत आईला दिलं 'सरप्राईज'!

Pune Muslim Girl Love Story: एका उच्चशिक्षित इंजिनिअर तरुणाचं सोशल मीडियावरून पुण्यातील एका मुस्लीम तरुणीशी सूत जुळलं.

पुण्याची ती मुस्लीम तरुणी आणि आणि इंजिनिअर भावाचा क्रूर अवतार; बहिणीचा काटा काढत आईला दिलं 'सरप्राईज'!
Pune Muslim Girl Love Story: हार्दिकनं बहिणीच्या शरीरावर तब्बल 84 वार करून तिची निर्घृण हत्या केली.
मुंबई:

Pune Muslim Girl Love Story: एका उच्चशिक्षित इंजिनिअर तरुणाचं सोशल मीडियावरून पुण्यातील एका मुस्लीम तरुणीशी सूत जुळलं. हे प्रेम इतकं टोकाचं होतं की, त्याने आपल्या संपूर्ण कुटुंबालाच संपवण्याचा विदारक खेळ मांडला. प्रेमासाठी सख्ख्या बहिणीचा काटा काढणाऱ्या या तरुणाने आपल्या आईला जे 'सरप्राईज' दिलं, ते पाहून संपूर्ण देश हादरला आहे. आपल्या प्रेमाच्या आड येणाऱ्या प्रत्येकाला संपवण्याच्या इराद्याने त्याने हे क्रूर पाऊल उचललं.

उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये ही थरारक घटना घडली असून, या घटनेचे धागेदोरे थेट पुण्याशी जोडले गेले आहेत.

पुण्याच्या तरुणीसाठी बहिणीचा क्रूर शेवट

आरोपी हार्दिक हा पेशाने इंजिनिअर असून गेल्या काही काळापासून तो सोशल मीडियाच्या आहारी गेला होता. याच माध्यमातून त्याची ओळख पुण्यातील एका मुस्लीम तरुणीशी झाली. हार्दिकला त्या तरुणीशी लग्न करायचे होते, मात्र त्याचे कुटुंब आणि विशेषतः त्याची जुळी बहीण हिमाशिखा या लग्नाच्या विरोधात होती. 

हिमाशिखा स्वतः देखील इंजिनिअर होती आणि भावाने आधी आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे, अशी तिची भूमिका होती. पुण्याच्या तरुणीशी असलेल्या संबंधांवरून आणि लग्नाच्या हट्टावरून घरात वारंवार खटके उडत होते. 

6 मार्च रोजी हा वाद विकोपाला गेला. आपल्या प्रेमकथेमध्ये बहीणच सर्वात मोठा अडथळा ठरत असल्याचा समज हार्दिकने करून घेतला आणि रागाच्या भरात त्याने भाजी कापण्याच्या सुऱ्याने हिमाशिखावर सपासप वार केले. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, त्याने बहिणीच्या शरीरावर तब्बल 84 वार करून तिची निर्घृण हत्या केली.

( नक्की वाचा : सक्तीच्या धर्मांतरावर सरकारचा चाबूक; संस्थांवर बंदी अन् कठोर शिक्षेची तरतूद, वाचा नव्या कायद्याची सर्व माहिती )
 

आईला दिलं ते भयानक 'सरप्राईज'

बहिणीचा जीव घेतल्यानंतर हार्दिकच्या डोक्यातील रक्ताचं वारं शांत झालं नव्हतं. तो रक्ताने माखलेल्या कपड्यांतच आपल्या आईच्या ऑफिसमध्ये पोहोचला. त्याची आई एका विमा कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. 

तिथे गेल्यावर त्याने अत्यंत शांतपणे आईला सांगितलं, "आई, चल घरी... तुझ्यासाठी एक मोठं सरप्राईज आहे." मुलाच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून आई घरी आली, पण घरात पाऊल ठेवताच समोर मुलीचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी आरडाओरडा सुरू करताच हार्दिकने त्यांच्यावरही हल्ला चढवला. सुदैवाने, या हल्ल्यात त्या वाचल्या असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

( नक्की वाचा : Amravati News: 'आदेश पाळणे आमच्या हातात नाही'; अमरावती झेडपी सीईओंचे कोर्टात थेट मंत्रालयावर खापर,प्रकरण काय? )
 

सोशल मीडिया आणि टोकाचं पाऊल

पोलीस तपासात हार्दिकने कबूल केलं की, पुण्यातील त्या तरुणीशी लग्न करण्याच्या त्याच्या निर्णयाला घरातून विरोध होत होता. बहीण आणि आई त्याला सतत करिअर सुधारण्याचा आणि या प्रेमसंबंधांपासून दूर राहण्याचा सल्ला देत होत्या. हाच सल्ला त्याला टोचत होता. दीड वर्षांपूर्वी नोकरी सोडल्यानंतर तो पूर्णवेळ मोबाईलमध्येच असायचा. प्रेमात पडलेला हा तरुण इतका हिंसक झाला की, ज्या बहिणीसोबत त्याने 25 वर्षं घालवली, तिचाच त्याने पुण्याच्या तरुणीसाठी बळी दिला.

पोलिसांनी 24 तासांत आवळल्या मुसक्या

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या 24 तासांच्या आत हार्दिकला बेड्या ठोकल्या. एका उच्चशिक्षित इंजिनिअर तरुणाने केवळ सोशल मीडियावरील ओळखीसाठी आणि लग्नाच्या हट्टासाठी स्वतःचं घर उद्ध्वस्त केल्याने परिसरात संतापाची लाट आहे. सोशल मीडियाचा अतिवापर आणि त्यातून निर्माण होणारी गुन्हेगारी प्रवृत्ती या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com