EX Girlfriend ला किस करणं पडलं महागात; गावकऱ्यांनी तरुणाच्या शरीराचे अवयव गोळा करून रुग्णालयात पोहोचवलं

तरुणाने आपल्या पहिल्या प्रेयसीसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम म्हणजे एक्स प्रेयसीने तरुणाची भयंकर अवस्था केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Crime News : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका तरुणाने आपल्या पहिल्या प्रेयसीला जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ही चूक तरुणाला महागात पडली. ही घटना उत्तर प्रदेशातील बिल्हौर परिसरातील दरियापूर गावातील आहे. तरुणाने आपल्या पहिल्या प्रेयसीसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम म्हणजे एक्स प्रेयसीने तरुणाची भयंकर अवस्था केली. यानंतर तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

अजब प्रकरण...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरियापूर येथील निवासी ३५ वर्षीय चंपी याचं गावातील एका तरुणीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. मात्र काही दिवसात तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं. यानंतर तरुणी एक्स प्रियकरापासून दूर राहू लागली. यामुळे चंपी खूप दु:खी झाला होता. तो वारंवार तरुणीला भेटण्याचा प्रयत्न करीत होता.

नक्की वाचा - Mumbai News : इच्छा नसताना 'तो' ची 'ती' झाली; कॉलेज विद्यार्थ्यासोबत भयंकर घडलं, एक आयुष्य कायमचं उद्ध्वस्त

सोमवारी दुपारी तरुणी किराणा घ्यायला जात होती. तरुणीला एकटं पाहून चंपी तेथे पोहोचला. तो तरुणीची छेड काढू लागला. तरुणीने विरोध केला. ती त्याला दूर सारत होती. मात्र तरुण जबरदस्ती करीत होता. यादरम्यान तरुणाने जबरदस्तीने तरुणीला किस करण्याचा प्रयत्न केला. रागाच्या भरात तिने तरुणाच्या जीभेचे तुकडे केले.

Advertisement

कुटुंबीय रुग्णालयात...

ही घटना गावकऱ्यांना कळालं. ते तिथं दाखल झाले. गावकऱ्यांनी चंपी आणि त्याची तुटलेली जीभ घेतली आणि रुग्णालय गाठलं. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी कानपूरच्या रुग्णालयात रेफर केलं.

Topics mentioned in this article