एका बेरोजगार तरूणाचं लग्न ठरलं होतं. त्यावेळी बायकोला इंप्रेस करण्यासाठी त्याने एक थाप मारली. पण एक वर्षानंतर मारलेली ही थाप त्याच्याच अंगाशी आली. त्यानंतर या तरूणाचं भांड फुटलं. पण आपण पोलिस आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी केलेली आयडिया सर्वांनाच चक्रावून सोडणारी अशीच आहे. हा तरूण अमरावतीचा असून आता त्याच्या विरोधात कारवाई केली जात आहे. हा तरूण अमरावती जिल्ह्यातील विर्शी गावचा रहिवाशी आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बेरोजगार असताना एका तरुणानं लग्नाच्या वेळी होणाऱ्या बायकोला आपण पोलिस दलात भरती झाल्याची थाप मारली होती. परंतु वर्षभरानंतरही तो कुठल्याच पोलिस दलात हजर झाला नाही. त्यामुळे बायको वारंवार संशय व्यक्त करत होती. त्याच्याकडे विचारणार करत होती. तुम्ही कुठल्या पोलिस स्थानकात कामाला आहात ते सांगा असा तगादा तिने लावला होता. शेवटी बायकोचं समाधान करण्याचं त्याने ठरवलं.
ट्रेंडिंग बातमी - सफाई कामगार झाली उपमहापौर, आता रस्त्यावर भाजी विकण्याची वेळ, कारण ऐकून हैराण व्हाल
या महाशयानं दौंडमधील राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात थेट घुसखोरी केली. जय राजेंद्र यादव असं त्याचं नाव आहे. त्याचं वय 25 वर्षे आहे. हा तोतया पोलिस अमरावती जिल्ह्यातील भातुकली तालुक्यातील विर्शी गावचा रहिवासी आहे. त्याच्यावर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय यादव याने दोन वेळा राज्य राखीव पोलिस दलाची भरती परीक्षा दिली होती. मात्र तो अनुत्तीर्ण झाला आहे. त्याने तायक्वांदोचे प्रशिक्षण घेतले आहे.
ट्रेंडिंग बातमी - महिला वाहतूक पोलिसांची तत्परता, गर्भवती महिलेची रस्त्याच्याकडेलाच केली प्रसूती
या महाशयाने बायकोचं समाधान करण्यासाठी पोलिसाचा पेहराव परिधान करत 23 नोव्हेंबरला दौंडमधील नानवीज येथील राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी केली. केंद्राच्या आवारातील इमारती, कार्यालये, मैदानाचे छायाचित्रण त्याने केले. शिवाय काही व्हिडिओ ही काढले. त्याच वेळी केंद्रातील अधिकारांना तो संशयास्पद वाटला. त्याच्याकडे केंद्रातील पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यानंतर त्याचे सत्य समोर आले. शिवाय त्याने असं का केले याचा धक्कादायक खुलासाही त्याने यावेळी केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world