विद्यार्थिनींचे खासगी व्हिडिओ काढून केले व्हायरल; पुण्याच्या प्रसिद्ध कॉलेजातील धक्कादायक प्रकार

पुण्यातील अत्यंत नामांकित महाविद्यालयाच्या वसतिगृहातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
पुणे:

पुण्यातील प्रसिद्ध सीओईपी महाविद्यालयाच्या (कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे) वसतिगृहातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या वसतिगृहात विद्यार्थिनींचे खासगी व्हिडिओ चोरून शूट करणे आणि त्याचा गैरवापर केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आर्या गिरीश काळे आणि विनीत सुराणा हे दोघेजण विद्यार्थिनींचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर पाठवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपी आर्या ही वसतिगृहातील विद्यार्थिनींचे चोरून व्हिडिओ शूट करीत होती. हे व्हिडिओ मित्र विनीत सुराणा याला पाठवत होता. सुराणा या व्हिडिओंचा चुकीचा वापर करीत होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे व्हिडिओ तो पाठवत असल्याचं सांगितलं जात आहे. 

या प्रकरणानंतर वसतिगृहातील विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांकडून या दोघांची कसून चौकशी केली जात आहे. 

बातमी अपडेट होत आहे.  
 

Advertisement