Crime News: एक वाक्य खटकलं.. मुलाने वडिलांना जिवंत जाळलं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

हरियाणामधून एक काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली असून फक्त अभ्यासासाठी ओरडल्याने मुलाने वडिलांना जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

हरियाणा: आई- वडील आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आयुष्यभर झटत असतात. त्यांच्याच यशासाठी, प्रगतीसाठी ओरडतात. मात्र अलिकडच्या काळात पालकांकडून कोणत्याही सूचना, बंधने मुलांना नको वाटतात. आई वडील ओरडल्याचा राग मनात धरुन अनेकदा मुले टोकाचे पाऊल उचलतात. अशातच हरियाणामधून एक काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली असून फक्त अभ्यासासाठी ओरडल्याने मुलाने वडिलांना जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  हरियाणातील फरीदाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 14 वर्षांच्या मुलाने आपल्या वडिलांना खोलीत बंद करून बाहेरुन आग लावली. या आगीमध्ये होरपळून वडिलांचा दुर्दैवी अंत झाला. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून अख्ख गाव हादरुन गेले आहे. 

ही काळजाचा थरकाप उडवणारी आणि मन सुन्न करणारी घटना घटना फरीदाबादमधील नवीन नगरमध्ये घडली. वडिलांनी मुलाला पैसे चोरल्याबद्दल आणि अभ्यासात लक्ष देत नसल्याच्या कारणावरुन फटकारले होते. यानंतर, त्या मुलाने जे केले ते ऐकून सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडेल. वडिलांनी त्याला फटकारले तेव्हा मुलाने त्याला खोलीत बंद केले आणि नंतर खोलीला आग लावली. या घटनेत 55 वर्षीय आलम अन्सारी यांचा जागीच मृत्यू झाला.

Chhatrapati Shivaji Maharaj : शूरवीर योद्ध्याला मुजरा! शिवजयंतीनिमित्त खास मेसेज पाठवून प्रियजनांना द्या शुभेच्छा)

घराला आग लागल्यानंतर मुलाने गच्चीवरुन उडी मारुन पळ काढला. घराला आग लागल्याचे कळताच परिसरातील लोकांना घटनास्थळी पोहोचले आणि अन्सारीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. यानंतर मुलाने छतावरून उडी मारली आणि पळून गेला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडले आणि ताब्यात घेतले.

Advertisement

तथापि, घराला आग लागल्याचे कळताच परिसरातील लोकांना घटनास्थळी पोहोचले आणि अन्सारीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. यानंतर मुलाने छतावरून उडी मारली आणि पळून गेला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडले आणि ताब्यात घेतले. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.