Faridabad Raid : डॉक्टरचं घर नव्हे दहशतवादी अड्डा, पोलिसांची मोठी कारवाई, दिल्ली हल्ल्याचा कट उधळला

हरयाणामधल्या फरिदाबाद इथल्या एका डॉक्टरच्या घरावर जम्मू काश्मीर पोलिसांनी छापा मारला. छापेमारीत डॉक्टरच्या घरातून तब्बल 300 किलो आरडीएक्स जप्त करण्यात आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Faridabad News : भारतात पुन्हा एकदा पुलवामासारखा मोठा हल्ला करण्याचा कट उधळण्यात आला आहे. दहशतवादविरोधी कारवाई करताना पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. हरयाणामधल्या फरिदाबाद इथल्या एका डॉक्टरच्या घरावर जम्मू काश्मीर पोलिसांनी छापा मारला. छापेमारीत डॉक्टरच्या घरातून तब्बल 300 किलो आरडीएक्स जप्त करण्यात आलं आहे. त्यासोबतच दोन एके 47 रायफल आणि 84 जीवंत काडतुसं मिळाली आहेत. दोन स्वयंचलित पिस्तूलं तसंच 5 लीटर केमिकलसुद्धा जप्त करण्यात आलं आहे. 

कोण आहे हा डॉक्टर?

आदिल अहमद असं या डॉक्टरचं नाव आहे. आदिलने तीन महिन्यांआधी फरिदाबादमधली खोली सामान ठेवण्यासाठी भाड्याने घेतली होती. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार तीन डॉक्टर या संघटनेशी संबंधित होते. यापैकी दोन डॉक्टर, आदिल अहमद राथेर हा अनंतनागचा रहिवाशी आहे. तर  मुझम्मिल शकील हा पुलवामाचा रहिवाशी आहे. तर तिसरा डॉक्टर अजूनही फरार आहे. हे डॉक्टर दहशतवादी संघटना अंसार गजवत-उल-हिंदशी संबधित असल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा - Pune Crime: पुण्यात भाईगिरीचा अल्पवयीन पॅटर्न! गुन्हेगारी जगताचे भीषण वास्तव दाखवणारा REPORT

पोलिसांनी हे ऑपरेशन छुपेपणाने राबवले होते. रविवारी केलेल्या छापेमारीबद्दल कुणालाच माहिती नव्हती. ही कारवाई रविवारी एटीएसने केली. उत्तर प्रदेशा ते गुजरातपर्यंत जम्मू-काश्मीर ते आंध्र प्रदेशापर्यंत डॉक्टरांना पकडण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूरहून जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदसोबत लिंक असल्याकारणाने अनंतनाग येथून एका डॉक्टरला अटक केली होती. यादरम्यान जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी फरीदाबादमध्ये भाड्याने राहणाऱ्या एका डॉक्टरच्या खोलीवर छापा टाकला आणि तेथून 300 किलो आरडीएक्स जप्त केले. दिल्लीवर हल्ला करण्याचा डॉक्टरचा प्लान होता. त्यापूर्वीच डॉक्टरचा कट उधळण्यात आला आहे. 

३ महिन्यांपूर्वी भाड्याने राहायला आला

परिसरातील लोकांनी सांगितलं की, डॉ. आदिलने तीन महिन्यांपूर्वी खोली भाड्याने घेतली होती. घर घेण्यापूर्वीच त्याने घरमालकाला सांगितलं होतं की, तो डॉक्टर आहे. त्याला काही मेडिकल उपकरणं येथे ठेवायचं आहे. येथेच आरडीएक्स ठेवण्यात आले होते, मात्र घरमालकाला काहीच माहिती नव्हती. 

Advertisement