योगेश शिरसाट, अकोला
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात मुंडगाव येथे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपले कामकाज उरकून बापलेक बेडरूममध्ये झोपायला गेले.. दरम्यान याच वेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. 9 वर्षीय स्वराज सचिन ठाकरे हा गाढ झोपेत असताना.त्याचा मृत्यू झाला. सूत्रांच्या माहितीनुसार शनिवार रात्री 8.30 वाजता शॉर्टसर्किट होऊन घराला भीषण आग लागली. यात सचिन हरिभाऊ ठाकरे आणि मुलगा स्वराज सचिन ठाकरे या दोघे बापलेकांचा मृत्यू झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमका कसा झाला अपघात?
शनिवारी रात्रीच्या सुमारास नऊ वर्षीय स्वराज आपल्या बेडरूममध्ये झोपलेला होता. त्याचवेळी शॉर्टसर्किट होऊन घराला अचानक आग लागली. शॉर्टसर्किट झाल्याने बेडरूममधून मोठ्या प्रमाणात धूर आणि आगीचे लोळ उठले. यावेळी वडील सचिन ठाकरे बाहेर होते. ते मुलाला वाचवण्यासाठी बेडरूम गेले, त्याचवेळी दोघेही आगीत होरपळले. तर गावकऱ्यांनी धाव घेत मोठ्या शर्तीने बापलेकांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात पाठवलं.आहे. .
नक्की वाचा - Pune Crime : पिस्तुल पाहताना अचानक गोळी सुटली, वाढदिवसाच्या पार्टीत एकच गोंधळ
या दुर्घटनेत नऊ वर्षीय स्वराज आणि 40 वर्षीय सचिन ठाकरे यांचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला आहे. तर या आगीत संपूर्ण घर जळून खाक झालं असून घरातील सर्व वस्तूही भस्मसात झाल्या आहेत. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून घटनास्थळी स्थानिक पोलीस यांच्यासह नायब तहसीलदार, पोलीस पाटील तसेच तलाठी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला. ही आग कशामुळे लागली याचा शोध पोलीस करीत आहेत. मात्र अचानक लागलेल्या आगीमुळे आणि त्यात बापलेकरांना जीव गमावावा लागला. एकाच वेळी बाप लेकांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबतचा अधिक तपास स्थानिक अकोटचे ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस तपास करीत आहेत.