अकोला हादरलं! पोटच्या लेकीवर बापाचा अत्याचार, मामानंही सोडलं नाही

सर्वांना हदरवून सोडणारी घटना घडली आहे. ही घटना इतकी भयंकर आहे की तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्या शिवाय राहाणार नाही.

Advertisement
Read Time: 2 mins
अकोला:

बदलापूरची घटना ताजी असताना अकोल्यात पुन्हा: एकदा सर्वांना हदरवून सोडणारी घटना घडली आहे. ही घटना इतकी भयंकर आहे की तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्या शिवाय राहाणार नाही. इथल्या एका 10 वर्षाच्या चिमुरडीवर तिच्याच नराधम बापाने अत्याचार केलेत. ऐवढेच नाही तर तिच्या मामानेही तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणाचा तपास करत असतानाच तिच्या बापानंही तिचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले. इयत्ता दुसरीत असल्यापासून तिचे शोषण होत होते. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मनात चिड निर्माण करणारी ही घटना अकोल्यात घडली आहे. 24 ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्यातल्या हिंगणा तामसवाडी गावात एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार झाला होता. याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली होती. आई वडील गावाला निघून गेल्याने त्यांनी पिडीत मुलीला आपल्या नातेवाईकांकडे ठेवले होते. त्याच वेळी तिच्या मामाने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस तपास सुरू झाला. शिवाय मुलीचा बाल न्याय मंडळासमोर जबाबही नोंदवला गेला. 

ट्रेंडिंग बातमी - आधी सहकार्याची हत्या, नंतर स्वत:वर गोळी झाडली, चक्रावून सोडणाऱ्या 'त्या' हत्याकांडाचे गुढ उकललं

ज्या वेळी हा जबाब नोंदवला जात होता त्यावेळी आणखी एक धक्कादायत माहिती समोर आली. मामाने अत्याचार केलाच. पण ज्यावेळी पिडीत मुलगी ही दुसऱ्या इयत्तेत शिकत होती तेव्हा पासून वडीलही आपल्यावर अत्याचार करत होते. अशी धक्कादायक माहिती तिने जबाब नोंदवताना दिली. तिने दिलेल्या या जबाबानंतर न्याय मंडळा बरोबरच पोलीसही हादरून गेले. त्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. 

ट्रेंडिंग बातमी - पती पत्नी अन् जादूटोणा? नदीच्या संगमाजवळ दोघांचे मृतदेह, हैराण करणार हत्याकांड

या प्रकरणी पिडीत मुलीचा मामा आणि तिच्या नराधम बापाला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्यावर कडक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच आमदार अमोल मिटकरी यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली होती. शिवाय या प्रकरणातील आरोपींनी कडक शिक्षा झाली पाहीजे अशी मागणी त्यांनी केली. त्याच बरोबर या प्रकरणाची सुनावणी बदलापूर प्रकरणा प्रमाणे जलदगती न्यायालया समोर व्हावी असी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान याबाबत ठाणे प्रभारी विजय चव्हाण दोषींनी पकडले असल्याची माहिती दिली आहे. 

Advertisement