जाहिरात

पती पत्नी अन् जादूटोणा? नदीच्या संगमाजवळ दोघांचे मृतदेह, हैराण करणार हत्याकांड

शेतीत धान आल्याने हे दोघेही सध्या घरा ऐवजी शेतीत राहात होते. पण सोमवारपासून हे दोघेही गायब होते.

पती पत्नी अन् जादूटोणा? नदीच्या संगमाजवळ दोघांचे मृतदेह, हैराण करणार हत्याकांड
गडचिरोली:

गडचिरोलीच्या एटापल्लीत दोघांच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. एटापल्ली जवळ करपनफुंडी हे गाव आहे. या गावात बहुसंख्य हे आदिवासी आहेत. या गावात मोठ्या प्रमाणात जादूटोणाच्या घटना घडत असतात. याच गावात रैनू जंगली गोटा आणि बुर्गो रैनू गोटा हे वृद्ध दाम्पत्य राहात होते. रैनू हे पुजारी होते. तर त्यांची पत्नी ही शेतीचं काम पाहात होती. शेतीत धान आल्याने हे दोघेही सध्या घरा ऐवजी शेतीत राहात होते. पण सोमवारपासून हे दोघेही गायब होते. त्यांचा शोध घेतला गेला. त्यानंतर गावातल्या जांभिया आणि बांडे या नद्यांच्या संगमावर या दोघांचे मृतदेह आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सोमवारी गायब झाल्यानंतर मंगळवारी बुर्गो रैनू गोटा, वय 55 यांचा मृतदेह नदीच्या संगमावर सकाळी दहाच्या सुमारास आढळून आला. हा मृतदेह दोरीने बांधला होता. त्यांचे हात पाय बांधले होते. शिवाय शरीरावर भला मोठा दगडही बांधला होता. त्यामुळे हा जादूटोण्याचा प्रकार असावा असे प्रथमदर्शनी गावातील लोकांनी शंका व्यक्त केली आहे. मात्र त्यांच्या पतीचा मृतदेह मिळत नव्हता. पण बुधवारी रैनू गोटा यांचाही मृतदेह त्याच ठिकाणी आढळून आला. त्यामुळे संपूर्ण गाव हादरून गेले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या कारवर दगडफेक, ठोंबरे हॉस्पिटलमध्ये दाखल

ज्या गावात हे हत्याकांड झाले ते गाव अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारे आहे. त्यामुळे इथे जादूटोणा सर्रासपणे सुरू असतो. आता पर्यंत या भागात जितके खून झाले आहेत ते जादूटोण्यातूनच झाले आहेत. त्यामुळे हे खूनही जादूटोण्यातून झाल्याचा पोलीसांचाही अंदाज आहे. शिवाय मालमत्तेतून ही हा खून झाला आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. ज्या दाम्पत्याचा खून झाला आहे त्यांना सहा मुले आहेत.शिवाय त्यांच्याकडे चांगली शेतीही आहे. 

ट्रेंडिंग बातमी - सिडकोची लॉटरी, स्वप्नातल्या घराच्या किंमती कितीने वाढल्या?

त्यामुळे मालमत्तेच्या वादातून तर हे खून झाले नाहीत ना? या अँगलचाही विचार पोलीस करत आहे. हे गाव अत्यंत दुर्गम ठिकाणी आहे.त्यामुळे या हत्येचा तपास करण्याचे मोठे आवाहन गडचिरोली पोलीसां समोर असणार आहे. शिवाय शेतात हे दाम्पत्य एकटेच राहात होते. त्यामुळे काही चोरट्यांनी तर हे कृत्य केले नाही ना याचाही शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी सुरू असून अजून कोणतेही ठोस कारण पोलीसांच्या हाती लागलेले नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com