Jalgaon Crime : विवाह कार्यालयात बापाने मुलगी आणि जावयावर झाडल्या गोळ्या; जळगाव हादरलं!

या घटनेनंतर विवाह कार्यालयात एकच गोंधळ उडाला. या गोळीबारात आणखी एका महिला जखमी झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Jalgaon Crime : आपल्या लेकीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून बापाने मुलीसह जावयावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातल्या आंबेडकरनगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत मुलगी तृप्ती वाघ हिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जावई अविनाश वाघ गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणात अन्य एक महिलाही गोळीबाराच्या घटनेत जखमी झाली आहे. किरण मांगले यांची मुलगी तृप्ती वाघ हिने अविनाश वाघ याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. मात्र किरण मांगले यांचा या लग्नाला विरोध होता. याच संतापातून किरण मांगले यांनी मुलगी आणि जावईवर गोळीबार केला.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जळगावात काय घडलं?



जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील आंबेडकरनगरमध्ये नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी पुण्यावरून किरण मांगले यांची मुलगी तृप्ती आणि जावई अविनाश आले होते. याची माहिती मिळताच शिरपूरमधील किरण मांगले चोपडा येथे विवाह समारंभात दाखल झाले. त्यांनी मुलगी तृप्ती वाघ व जावई अविनाश वाघ या दोघांवर थेट गोळीबार केला. गोळीबाराच्या घटनेत मुलगी तृप्ती वाघ हिचा जागीच मृत्यू झाला असून जावई अविनाश वाघ गंभीर जखमी झाला आहे. तर गोळीबाराच्या घटनेत विवाह सोहळ्यात उपस्थित असलेली एक महिलाही गंभीर जखमी झाली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिकांनी किरण मांगले यास चांगला चोप दिला असून जमावाने चोप दिल्याने किरण मांगले ही गंभीर जखमी झाला आहे. किरण मांगले हे सीआरपीएफमधील माजी पोलीस अधिकारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्यांच्याजवळ असलेल्या सर्विस रिवाल्वरमधून किरण मांगले यांनी हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Pune Crime : बोपदेव अत्याचार प्रकरणातील तिसरा आरोपी ताब्यात ! 6 महिन्यानंतर मोठं यश

गोळीबार करणारे किरण मांगले माजी पोलीस अधिकारी असल्याची पोलिसांनी माहिती दिली. माजी पोलीस अधिकारी असल्याने त्यांच्याजवळ असलेल्या परमिट रिवाल्वरमधून गोळीबार केल्याची माहिती आहे. विवाह सोहळ्यात मुलीसह जावयावर किरण मांगले यांनी गोळीबार केल्याने विवाह कार्यात एकच गोंधळ उडाला. गोळीबार करून मुलीला ठार केल्यानंतर स्थानिकांनी किरण मांगले यांना चोप दिला. जमावाने चोप दिल्याने गोळीबार करणारे किरण मांगलेही गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. 

Advertisement