
देवा राखुंडे, प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातल्या सासवड जवळच्या बोपदेव घाटात सहा महिन्यापूर्वी तरुणीवर अत्याचार झाला होता. या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिसांनी आज (शनिवार, 26 एप्रिल) त्याला ताब्यात घेतले. त्याला आता पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. बापू उर्फ दशरथ गोसावी असं या आरोपीचं नाव आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात पुणे पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून दुसऱ्या आरोपीला अटक केली आहे. अख्तर शेख असं 27 वर्षीय आरोपीचं नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तरुणावर अत्याचार करणाऱ्यांमध्ये तीन तरुणांचा समावेश होता. आतापर्यंत दोन आरोपींना पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलं होतं. पण, तिसरा आरोपी सापडत नव्हता. अखेर त्यालाही जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळालंय.
काय होती घटना?
3 ऑक्टोबरला मध्य रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं. त्यानंतर पुणे शहरात त्याचे पडसाद पाहायला मिळाले. महिला पुणे शहरात सुरक्षित आहेत की नाही यावर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
( नक्की वाचा : Pahalgam Terror Attack : पुण्यातील पर्यटकाला दिसले संशयित दहशतवादी! NIA च्या तपासाला मिळणार गती )
पुणे पोलिसांकडून जेव्हा तपासणी सुरू करण्यात आली तेव्हा सगळ्यात पहिले एक CCTV फुटेज जरी करण्यात आला होता. ज्यामध्ये तीन मूलं दिसले होते. पण ते आरोपी नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर दोन आरोपींचे स्केच जारी करण्यात आले. ज्यावर दहा लाखाचं बक्षीस देखील जाहीर केलं होतं. त्यासाठी पुणे पोलिसांना जवळपास 250 हून अधिक कॉल आले होते. पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेने आरोपींना पकडण्यासाठी 60 हून अधिक पथकं तैनात केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world