Jalna News: तहसीलदारांसमोरच महिला सरपंचाला मारहाण, VIDEO होतोय व्हायरल

त्या विरोधात ग्रामपंचायतीकडून तहसीलदार यांच्याकडे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्याची मागणी करण्यात आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
जालना:

लक्ष्मण सोळुंके

महिलांना सगळ्याच क्षेत्रात महत्वाचे स्थान दिले आहे. महिलांनी आपल्याला प्रत्येक क्षेत्रात सिद्ध ही केलं आहे. असं कोणतंही क्षेत्र नाही ज्यात महीला पुढे नाहीत. प्रत्येक ठिकाणी त्या आघाडीवर असलेल्या दिसतात. राजकारणात ही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. पण या गोष्टी आजही काही जणांना खटकतात. त्यातूनच एक भयंकर प्रकार जालना जिल्ह्यात घडल्याचं समोर आलं आहे. भोकरदन तालुक्यातील चोर्राळा-मासनपुर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचानाच मारहाण झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही मारहाण तहसीलदारांसमोरच झाली आहे.  
 
महसूल विभागामार्फत  सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत शेत रस्ते, पाणंद रस्त्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातात. त्यानुसार भोकरदन तालुक्यातील चोर्राळा-मासनपुर ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने ग्रामसभेत शेत रस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या रस्त्याला दोन जणांनी विरोध केला. शिवाय या रस्त्यावर अतिक्रमण करत, रस्त्यावरून जाण्यास मज्जाव केला होता. या प्रकरणी ग्रामपंचायत आणि ग्रामविकास अधिकारी यांनी या शेतकऱ्यांना सूचना करून ही ते अतिक्रम काढण्यास विरोध करत होते. 

नक्की वाचा - Kalyan News: 7 जणांकडून 5 महिने 1 अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, अश्लील VIDEO व्हायरल

त्या विरोधात ग्रामपंचायतीकडून तहसीलदार यांच्याकडे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तहसीलदार या रस्त्याची पाहणी  करण्यासाठी चोर्राळा-मासनपुर शिवारात आले होते. त्यावेळी तहसीलदार चर्चा करत असताना इतर शेतकऱ्यांचे आणि या दोन शेतकऱ्यांचा वाद सुरु झाला. हा वाद पुढे वाढत गेला. तो हाणामारी पर्यंत पोहोचला. तो तेवढ्यावरच थांबला नाही तर रस्त्याला विरोध करणाऱ्या दोघांनी गावच्या महिला सरपंचावरच हात उगारला. त्यांना मारहाण करण्यात आली. 

नक्की वाचा - Navi Mumbai Airport: नवी मुंबई एअर पोर्टवरून कुठे कुठे विमानं जाणार? एअर इंडियाने जारी केली पहिली लिस्ट

कमल लोखंडे असं या महिला सरपंचांचे नाव आहे. त्यांना चक्क तहसीलदार यांच्यासमोरच मारहाण करण्यात आली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण पोलीसात गेले. महिला सरपंच यांच्या तक्रारीवरून भोकरदन पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार यांच्या समोरच ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  पांदण रस्ता मोकळा करून देण्यासाठी आलेल्या तहसीलदार यांच्या समोरच दोघांनी ही मारहाण केली. महिला सरपंचाच्या तक्रारी वरून मारहाण करणाऱ्या 2 मुख आरोपींसह  14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.